बेळगाव : 350 दुकानगाळ्यांचा होणार लिलाव

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : येत्या तीन महिन्यात महापालिकेच्या विविध व्यापारी संकुलातील तब्बल 350 दुकानगाळ्यांचा लिलाव केला जाणार आहे. त्यात गोवावेस, सीबीटी येथील गाळ्यांचाही समावेश आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार 2010 साली 350 दुकानगाळ्यांच्या भाडेकराराची मुदत 12 वर्षांसाठी वाढविण्यात आली होती. ती मुदत मार्च 2022 मध्ये संपणार आहे. नियमानुसार त्याआधी तीन महिने त्या दुकानगाळ्यांचा लिलाव करावा लागणार असल्याने नोव्हेंबरपासूनच महसूल विभागाकडून त्याबाबतची कार्यवाही सुरु होणार आहे. संबंधित गाळेधारकांना महापालिकेकडून याबाबतची नोटीस दिली जाणार आहे.
त्यांच्याकडे अनामत रक्कम किंवा भाडेरक्कम थकीत असल्यास ती रक्कम तातडीने भरण्यास सांगितले जाणार आहे. त्या भाडेकरुंना पुन्हा दुकानगाळे हवे असल्यास त्यांना लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे लागणार आहे. त्यासाठी निश्‍चित अनामत रक्कम भरावी लागणार असून भाडेरकमेवर बोली लावावी लागेल. महापालिकेच्या व्यापारी संकुलातील दुकानगाळ्यांच्या भाडेकराराची मुदत 2010 मध्येच संपणार होती. त्यावेळी शासनाकडून संबंधित गाळेधारकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी अनामत व भाडेरक्कम नव्याने निश्‍चित करावी. आधी त्यांच्याकडून थकीत भाडेरक्कम वसूल करावी. नव्या दरानुसार अनामत व भाडेरक्कम निश्‍चित करावी. त्यानुसारच त्यांना भाडेकराराची मुदत वाढवून द्यावी, असे सांगण्यात आले. त्यामुळे महापालिकेच्या महसूल विभागाने सर्व गाळेधारकांना नोटीस बजावून थकीत भाडे भरण्याची सूचना दिली.
नव्या दरानुसार अनामत व भाडेरक्कम निश्‍चित करून ती रक्कम भरण्याची लेखी सूचनाही देण्यात आली. रक्कम भरून घेतल्यानंतरच त्यांना 2022 सालापर्यंत भाडेकराराची मुदत वाढवून देण्यात आली. 350 गाळ्यांच्या भाडेकराराची मुदत मार्चमध्ये संपणार आहे. त्यासंदर्भातील पुढील कार्यवाही करण्याची मुभा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी महसूल विभागाला दिली. त्यानुसार, महसूल विभागाने तयारी सुरू केली आहे. डिसेंबरमध्ये या गाळ्यांसाठी लिलाव प्रक्रिया राबविली जाऊ शकते. सध्या या दुकानगाळ्यांच्या माध्यमातून पालिकेला सुमारे दीड कोटी रुपये उत्पन्न मिळते. लिलावानंतर हे उत्पन्न वाढेल, असे महसूल विभागाचे म्हणणे आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 350 दुकानगाळ्यांचा होणार लिलाव

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm