Mirage 2000 विमान कोसळले, पायलट किरकोळ जखमी

belgavkar.com | belgaum | belgavkar

भारतीय वायुसेनेच्या (IAF) विमानाचा मध्यप्रदेशात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय हवाई दलाचे मिराज-2000 विमान गुरुवारी मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यातील बाबडी गावात कोसळले. दरम्यान, विमानाचा पायलट सुरक्षित आहे. ग्रामस्थांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. भिंडपासून सुमारे 6 किमी अंतरावर असलेल्या माणकाबाद येथील बाजरीच्या शेतात हे विमान कोसळले आहे.
एक प्रशिक्षणार्थी वैमानिक विमान उडवत होता, पण या घटनेतून तो सुरक्षित वाचला आहे. घटनेची माहिती मिळथाच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 
फ्लाइट लेफ्टनंट अभिलाष असे वैमानिकाचे नाव आहे. भारतीय हवाई दलानेही ट्विट करुन या अपघाताची माहिती दिली आहे. तसेच या अपघाताच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. 'आयएएफच्या मिराज 2000 विमानात आज सकाळी एका प्रशिक्षण उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाला. विमान शेताक कोसळले असून, अपघातात पायलट सुखरूप आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत,'अशी माहिती हवाई दलाकडून देण्यात आली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

Mirage 2000 विमान कोसळले, पायलट किरकोळ जखमी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm