बेळगाव : भीषण अपघातात 2 जण ठार; कार 100 फूट खाली कोसळली

बेळगाव : भीषण अपघातात 2 जण ठार;
कार 100 फूट खाली कोसळली

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. निपाणी : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर (NH4 हायवे) सौंदलगा हद्दीत कळंत्रे मळयासमोर भरधाव कार चालकाचा ताबा सुटून सुमारे शंभर फूट खाली शेतवाडीत जाऊन कोसळल्याने झालेल्या अपघातात कारमधील दोघे जण जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी रात्री 9:30 च्या सुमारास झाला. अपघातातील मृत दोघे इचलकरंजी येथील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांची नावे मिळू शकली नाहीत. मयत झालेले दोघेजण मूळ राजस्थानचे असून इचलकरंजी येथे फरशी बसवण्याचे काम करत असल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कागल येथून निपाणीच्या दिशेने जाणारी कार सौंदलगा जवळील कळंत्रे मळा येथे असलेल्या लहान भुयारी मार्गाजवळ आली. यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक चार ते पाच सिमेंटच्या पोलला धडक देऊन सुमारे शंभर फुट फरपटत जाऊन पलटी झाली. यावेळी झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर चालकाच्या बाजूला बसलेला अन्य एक जण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी निपाणी येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : भीषण अपघातात 2 जण ठार; कार 100 फूट खाली कोसळली

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm