बेळगाव : अपघातात टिळकवाडीतील महिला ठार; मुलगी गंभीर जखमी

बेळगाव : अपघातात टिळकवाडीतील महिला ठार;
मुलगी गंभीर जखमी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कोल्हापूर सर्कलजवळ दुचाकी दुभाजकावर धडकल्याने टिळकवाडीतील महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी पहाटे घडली आहे. पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून कोल्हापूर सर्कल येथून टिळकवाडीच्या दिशेना जाताना झालेल्या अपघातात पूजा महेश गावडे (वय 45, रा. आगरकर रोड, टिळकवाडी) ही महिला ठार झाली. तर अपघातात तिची मुलगी तन्वी महेश गावडे (वय 18) ही गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
गावी जाताना त्यांनी दुचाकी कोल्हापूर सर्कल येथे पार्क केलेली होती. पहाटेच्यावेळी बसने गावावरून आल्यानंतर कोल्हापूर सर्कल येथे लावून ठेवलेल्या दुचाकीने दोघीही टिळकवाडी येथे घराकडे जात असताना हा अपघात घडला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : अपघातात टिळकवाडीतील महिला ठार; मुलगी गंभीर जखमी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm