बेळगाव : हायवेवर अपघातात मुलगी ठार; 5 जण जखमी

बेळगाव : हायवेवर अपघातात मुलगी ठार;
5 जण जखमी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. हुक्केरी - संकेश्वर : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर (NH4 हायवे) संकेश्वरजवळ इनोव्हा कारने थांबलेल्या ट्रकला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये एक ठार तर पाचजण जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे. हुबळीहून निपाणीकडे भरधाव वेगात जाणाऱ्या इनोव्हा (केए 03 एसी 2588) कारने थांबलेल्या मालवाहू ट्रकला (एमएच 10 सीआर 7560) पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर फाटा संकेश्वरजवळ जोराची धडक दिली.
या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या प्रिया मनोज पाटील (वय 12, रा. नवनगर, हुबळी) हि जागीच ठार झाली असून कार मधून प्रवास करणारे अन्य पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना बेळगाव येथील केएलई रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. प्रिया पाटील ही जागीच ठार झाली. तर ज्योती मनोज पाटील (वय 30), प्रिती मनोज पाटील (10), गीता मनोज पाटील (8) व आरती दशरथ खाडे (23) जखमी झाले. मयत व जखमी कारमध्ये पाठीमागील सीटवर बसले होते. पुढील सीटवर बसलेले मनोज मोहन पाटील व चालक उमेश मुकुंद माने यांना किरकोळ दुखापत झाली आहे. कंटेनरचा चालक रोहित कृष्णा मनीपुरीला (रा. रामपूर, धारवाड) याला चौकशीसाठी संकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संकेश्वराचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी अपघाताचे वृत्त समजताच तातडीने घटना स्थळी भेट अपघातामधील जखमींना उपचारासाठी ताबडतोब बेळगाव येथील केएलई रुग्णालयामध्ये हलविले आणि घटनेची पाहणी करून पंचनामा केला. अपघामधील मृताच उत्तरीयं तपासणीनंतर उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सदर घटनेची नोंद संकेश्वर पोलिसमध्ये झाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : हायवेवर अपघातात मुलगी ठार; 5 जण जखमी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm