बेळगाव ग्रामीणमधून निवडणूक लढवण्यासाठी आग्रह

बेळगाव ग्रामीणमधून निवडणूक लढवण्यासाठी आग्रह

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांची कन्या श्रद्धा अंगडी उर्फ शेट्टर यांनी बेळगाव ग्रामीण मतदार संघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी तालुक्यातील विविध गावांमधील भाजप नेतेमंडळींनी केली आहे. बेळगाव ग्रामीण मतदार संघातील विविध गावातील नेतेमंडळींनी आज बुधवारी सकाळी दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या गृहकचेरीमध्ये श्रद्धा शेट्टर यांची भेट घेऊन उपरोक्त आग्रह केला.
तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधींची आम्हाला गरज आहे. तेंव्हा कांहीही करा पण तुम्हीच बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढवा, अशी मागणी यावेळी विविध गावचे नेते मंडळींकडून श्रद्धा शेट्टर यांच्याकडे करण्यात आली. आपणाला निवडणुकीत विजय करून आमदार केल्यास आमच्याकडून दिवंगत सुरेश अंगडी साहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिल्या सारखे होईल. तेंव्हा आपण विधानसभा निवडणूक लढवलीच पाहिजे, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत, असेही या नेतेमंडळींनी यावेळी सांगितले. याप्रसंगी खासदार मंगला अंगडी या देखील उपस्थित होत्या.
श्रद्धा शेट्टर यावेळी बोलताना म्हणाल्या की, सध्यातरी समाजसेवे व्यतिरिक्त माझ्या डोक्यात दुसरा विचार नाही. तेंव्हा विधानसभा निवडणूक लढविणे ही दूरची गोष्ट आहे. तथापि आपल्या विनंतीला मान देऊन मी यासंदर्भात माझी आई आणि आप्तस्वकीयांशी चर्चा करेन. याबाबतीत निर्णय घेण्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे. याखेरीज निवडणूक कोण लढविणार? याचा निर्णय भाजप कोर कमिटी घेत असते आणि त्यावर हायकमांड शिक्कामोर्तब करते. त्यामुळे तूर्तास आमदारकीची निवडणूक लढविण्याचा बाबतीत मी ठामपणे कांही सांगू शकत नाही, असे श्रद्धा शेट्टर यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी बेळगाव ग्रामीण भागातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव ग्रामीणमधून निवडणूक लढवण्यासाठी आग्रह

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm