बेळगाव : वडगावातील त्या दुकानांबाबत तक्रार

बेळगाव : वडगावातील त्या दुकानांबाबत तक्रार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : वडगाव परिसरात रस्त्यावर व्यवसाय करणार्‍यांची संख्या वाढली आहे. सोनार गल्ली कॉर्नरवर सुरू करण्यात आलेल्या फास्टफूड दुकानांचा त्रास परिसरातील व्यावसायिक आणि रस्त्यावरून ये-जा करणार्‍यांना होत आहे. त्यामुळे याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रार नोंदविण्यात आली असून खाद्यपदार्थ उघड्यावर बनवू नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
रस्त्याशेजारी सुरू करण्यात आलेल्या फास्टफूड दुकानांत खाद्यपदार्थ उघड्यावर बनविण्यात येत आहेत. त्यामुळे खाद्यपदार्थ बनविताना वार्‍यामुळे उडणारी मिरची पावडर आणि फोडणीचा वास सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे परिसरातील अन्य व्यावसायिकांना आणि ये-जा करणार्‍या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याबाबत महापालिका आयुक्त रूद्रेश घाळी यांना निवेदन देऊन फास्टफूडचे खाद्यपदार्थ उघड्यावर बनवू नयेत याकरिता आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : वडगावातील त्या दुकानांबाबत तक्रार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm