बाबुल सुप्रियोंनी दिला खासदारकीचा राजीनामा; व्यक्त केल्या भावना, पंतप्रधान मोदींबद्दल म्हणाले....

बाबुल सुप्रियोंनी दिला खासदारकीचा राजीनामा;
व्यक्त केल्या भावना, पंतप्रधान मोदींबद्दल म्हणाले....

belgavkar.com | belgaum | belgavkar

काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाला राम राम ठोकत तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या बाबुल सुप्रियो यांनी मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे आपला खासदार पदाचा (भाजप) राजीनामा सोपवला आहे. बाबुल सुप्रियो यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच सुप्रियो यांनी भाजपाशी संबंध तोडल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारणात संधी दिल्याबद्दल तसंच पक्षात महत्त्वाच्या भूमिका दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. तसेच याबद्दल बोलताना ते भावूक झाल्याचं देखील पाहायला मिळालं. 
बाबुल सुप्रियो यांनी 2014 आणि 2019 अशा दोन वेळा आसनसोल लोकसभा मतदार संघातून विजय मिळवला होता. नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदही मिळालं. परंतु, यंदा पार पडलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता. यानंतर त्यांनी तडकाफडकी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला होता. भाजपासोबत राजकीय करिअरला सुरुवात केल्याने मी भावूक झालो आहे. मी पंतप्रधान, भाजपाध्यक्ष आणि अमित शाह यांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, असं म्हटलं आहे.
तसेच सुप्रियो यांनी गेल्या महिन्यात भाजपामधून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आपण राजकारणातून संन्यास घेत असल्याने खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. मी पूर्णपणे राजकारण सोडत आहे. जर मी पक्षाचा भाग नसेन तर ही जागा ठेवणं योग्य नाही असा विचार मी केला, असं देखील बाबुल सुप्रियो यांनी सांगितलं आहे. तृणमूलमध्ये सामील झाल्यानंतरही बाबुल सुप्रियोंनी ममता बॅनर्जींच्या बाजूने आणि भवानीपूरमध्ये भाजपाच्या उमेदवार प्रियंका तिब्रेवाल यांच्या विरोधात प्रचार करण्यास नकार दिला होता. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत बाबुल सुप्रियो भाजपाचे स्टार प्रचारक होते. परंतु, केंद्रीय मंत्रीपद गेल्यानंतर त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. टीएमसीमध्ये आल्यानंतर ते भवानीपूर ममता बॅनर्जींचा प्रचार करतील अशी आशा होती. पण, त्यांनी प्रचार करण्यास नकार दिला.  तृणमूल भवनात पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना बाबुल सुप्रियो म्हणाले होते की, भवानीपुरमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करण्याची माझी इच्छा नाही. भवानीपूरमधील भाजपाच्या उमेदवार प्रियंका तिब्रेवाल माझ्या वकील होत्या. त्या एक लढवय्या महिला आहेत. माझ्या बाजुने त्यांनी अनेक खटले लढवले आहेत. मला त्यांच्या विरोधात प्रचार करण्याची इच्छा नाही. त्यानंतर आता सुप्रियो यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बाबुल सुप्रियोंनी दिला खासदारकीचा राजीनामा; व्यक्त केल्या भावना, पंतप्रधान मोदींबद्दल म्हणाले....

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm