बेळगाव : मलप्रभेत मासे पकडताना पडल्याने मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. खानापूर : खानापूर येथील मलप्रभा नदीवरील पूल वजा बंधाऱ्यानजीक मासे पकडताना पाय घसरून बुडाल्याने मृत्युमुखी पडलेल्या मासेमाराचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आला. फकिरप्पा रामाप्पा भोवी (वय 61, रा. इटगी ता. खानापूर) असे त्याचे नाव आहे. फकीरप्पा रोज इटगीहून खानापूर येथे मलप्रभा नदीत मासे पकडण्यासाठी येत होता.
शनिवार नेहमीप्रमाणे मासे पकडताना त्याचा पाय घसरून तो पाण्यात बुडाला. याबाबत खानापूर पोलिस स्थानकात तक्रार देण्यात आली होती. सोमवारी सकाळी पाण्यावर तरंगताना त्याचा मृतदेह दिसून आला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : मलप्रभेत मासे पकडताना पडल्याने मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm