बेळगाव : आमदारांची बैठक चर्चेत

बेळगाव : आमदारांची बैठक चर्चेत

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी रविवारी सुटीच्या दिवशी महापालिकेच्या मुख्य सभागृहात घेतलेली नगरसेवकांची बैठक चर्चेचा विषय बनला आहे. आमदार बेनके यांनी रविवारी बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व नगरसेवकांची बैठक घेतली. विशेष म्हणजे या बैठकीला काही नगरसेविकांचे पती उपस्थित होते. या बैठकीनंतर महापालिकेतच स्नेहभोजन झाले. याआधी सप्टेंबरमध्ये भाजपच्या 35 नगरसेवकांची बैठक मुख्य सभागृहात झाली होती. गेल्या काही वर्षांत हे नियम धाब्यावर बसवून तेथे बैठका व कार्यक्रम होत आहेत.
भाजपच्या नगरसेवकांच्या बैठकीनंतर मुख्य सभागृहातच कॉंग्रेसच्या नगरसेवकांचीही बैठक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यासंदर्भात महापालिकेच्या कौन्सिल विभागातील अधिकाऱ्यांकडे विचारणाही झाली होती. पण, कॉंग्रेस नगरसेवकांची बैठक झाली नाही. पण कॉंग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी व लक्ष्मी हेब्बाळकर 25 ऑक्टोबरला महापालिकेत आढावा बैठक घेणार आहेत.
मार्च 2019 पासून महापालिकेचे कामकाज प्रशासकांकडून सुरू आहे. त्यातच शहराच्या दोन्ही आमदारांनी अनेकदा आढावा बैठक घेतली. त्यात बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी सर्वाधिक वेळा बैठक घेतली. महापालिकेच्या कामकाजावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अद्याप लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आलेले नाही. निवडणूक झाल्यानंतर लगचेच 17 सप्टेंबरला महापालिकेत आमदार अभय पाटील व अनिल बेनके यांनी बैठक घेतली. त्या बैठकीला भाजपचे सर्व 35 नगरसेवक हजर राहिले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : आमदारांची बैठक चर्चेत

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm