बेळगाव : 'या' गावात उभारण्यात येणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती; चबुतरा कामाला प्रारंभ

बेळगाव : 'या' गावात उभारण्यात येणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती;
चबुतरा कामाला प्रारंभ

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : होनगा येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती चबुतरा व सभोवताली उद्यान उभारण्याच्या कामाला युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. होनगा येथे काही महिन्यांपूर्वी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांची मूर्ती उभारण्यासाठी भूमिपूजन झाले होते.
बेळगाव तालुक्यातील होनगा गावात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्यावतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराज यांची मूर्ती बसविण्यात येणार आहे. आगामी काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास भावी पिढीसमोर उभा असावा व त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी, तसेच गावच्या ऐतिहासिक वैभवात भर पडावी या उद्देशाने होनगा ग्रामस्थ आणि देणगीदारांच्या सहकार्यातून शिवरायांची मूर्ती बसवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 'या' गावात उभारण्यात येणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती; चबुतरा कामाला प्रारंभ

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm