बेळगाव : कलईगार गल्लीत ट्रान्स्फॉर्मरवर चढून काम करताना तोल जाऊन खाली पडल्याने लाईनमन जखमी झाला. श्रीधर डोकरे असे जखमी लाईनमनचे नाव आहे. रविवारी कलईगार गल्लीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी डोकरे सहकाऱ्यांसह काम करीत होते. दुरुस्तीवेळी डोकरे ट्रान्सफॉर्मरवरून तोल जाऊन पडले.
गंभीर जखमी अवस्थेतील डोकरे यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. डोकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती 'हेस्कॉम'तर्फे देण्यात आली.be