बेळगाव : कपिलेश्वर उड्डाणपुलावर मांजा अडकून जखमी

बेळगाव : कपिलेश्वर उड्डाणपुलावर मांजा अडकून जखमी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कपिलेश्वर उड्डाणपुलावर मांजा अडकून एक दुचाकीस्वार युवक जखमी झाला. जखमी युवकावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात आले आहेत. यल्लाप्पा भीमाप्पा चतूर (वय 30, रा. यरमाळ) असे जखमीचे नाव आहे. कपिलेश्वर उड्डाण पुलावरून दुचाकीवरून जाताना मांजा त्यांच्या गळ्याला अडकला. त्यामुळे ते गाडीवरून खाली पडले. वेग कमी होता म्हणून किरकोळ जखमांवर निभावले.
गेल्या काही वर्षात मांजा अडकून जीव गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. डॉ. डी. सी. राजाप्पा पोलीस आयुक्त असताना त्यांनी मांजाविक्रीवर बंदी घातली होती. किराणा व स्टेशनरी दुकानात तपासणी करून मांजा जप्त करण्याची मोहीमच पोलिसांनी हाती घेतली होती. आता पतंगाचा मांजा डोकेदुखीचा ठरू लागला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कपिलेश्वर उड्डाणपुलावर मांजा अडकून जखमी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm