बेळगाव : राज्य मार्गावरील अपघातात एक ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. गोकाक : संकेश्वर - नरगुंद राज्य मार्गावरील गोकाक मालदिनी क्रॉसजवळ दोन दुचाकी गाड्यांची जोरदार धडक झाल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाल्याची घटना गोकाक ग्रामीण पोलिसांत दाखल झाली आहे. बाळेश शिवलिंगाप्पा मनोजी (वय 45, रा. नंदगाव, ता. गोकाक) असे मृताचे नाव आहे.
या प्रकरणी मिळालेली माहिती अशी, संकेश्वर - नरगुंद राज्य मार्गावरील गोकाक मालदिनी क्रॉसजवळ बालेश मनोजी गोकाककडून यरगट्टीकडे जात होता तर दुसऱ्या दुचाकीवरून कागल तालुक्यातील लिंगनूर येथील रहिवासी सचिन निळकंठ अकी दुचाकीवरून जात असताना दोघा वाहनांची धडक दिल्यामुळे बाळेश मनोजीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे रस्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दुचाकीवरील व्यक्ती जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : राज्य मार्गावरील अपघातात एक ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm