बेळगाव : सर्वम ट्रॉफीचा विजेता Dubai FC; बक्षीस रक्कम उपचारासाठी दिली

बेळगाव : सर्वम ट्रॉफीचा विजेता Dubai FC;
बक्षीस रक्कम उपचारासाठी दिली

belgavkar.com | belgaum | belgavkar

शहापूरातील चिमूकल्याला दुर्मिळ आजार;
₹ 16 कोटीच्या मदतीची गरज

: 16 कोटींचे इंजेक्शन.. आता सर्वमला तुमची गरज

बेळगाव : सर्वम या बाळाच्या 16 कोटीच्या इंजेक्शनसाठी मदत म्हणून 'सर्वम फुटबाॅल ट्रॉफी (Under-21)' आयोजित केली गेली होती. यावेळी बेळगावमधील फुटबॉलप्रेमी आणि खेळाडूंकडून ₹ 65000 रुपयांची मदत उपचारासाठी देण्यात आली.
U21 बॉईज फुटबॉल स्पर्धा, एकूण 20 संघ सहभागी
विजेता संघ : Dubai FC
उपविजेते : Turf KA22
अंतिम सामना निकाल : 3-1
गोल : तुषारने टर्फ केए 22 साठी पहिला गोल केला.
दुबई एफसीसाठी सिद्धार्थ शिंदेने 2 गोल आणि धनजय शिंदेने एक गोल केला.


सर्वोत्कृष्ट खेळाडू : कौशिक पाटील
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक : विनायक सुनकी
सर्वोत्कृष्ट फॉरवर्ड : सिद्धार्थ शिंदे
सर्वोत्तम संरक्षक - अलिस्तान पेरीएरा
अंतिम सामन्यासाठी अतिथी : बाळ सर्वम बाळेकुंद्री, हर्ष जॉन थॉमस, प्रदीप होसमनी, सूरज मजुकर, अनुराधा पाटील, सौरभ बिर्जे


या Football Tournament चे आयोजक : विजय रेडेकर, किरण चव्हाण, नीलेश साळुंके, अमरदीप पाटील, साहिल, विवेक सनदी, राकेश धाकलुचे, नवीन किनगी, तुषार पवार
LETS PLAY TO HELP SARVAM WIN.
Account Name - SARVAM M BALEKUNDRI
Account No. - 50100455282652
IFSC Code - HDFC0009529
Branch - SHAHAPUR BELGAUM तुम्ही ही मदत करू शकता.
अधिकृत संपर्क क्रमांक : 78997 75977 Phone Pe, Google Pay
शहापूर (लक्ष्मी रोड) येथील एका चिमुकल्याला स्पायनल मस्कुलार अट्रॉफी (Spinal muscular atrophy एसएमए-1) नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. त्याच्यावर सध्या बंगळूर येथील बॅपटीस हॉस्पिटलात उपचार सुरु आहेत. मात्र, या आजारातून पुर्णपणे बरे होण्यासाठी सर्वम मंगेश बाळेकुंद्री (वय 1 वर्षे 4 महिने) या बाळाला सुमारे ₹ 16 कोटी रुपयांच्या इंजेक्शनची गरज आहे.
त्याला झालेल्या आजारावरील उपचार अत्यंत महागडा असून त्यातील एका इंजेक्शनची किंमत तब्बल 16 कोटी रुपये आहे.
हे इंजेक्शन फक्त यूएसमध्ये मिळते. त्या इंजेक्शनवर इम्पोर्ट ड्युटी लावली तर त्याची किंमत ही तब्बल 20 कोटी रुपयापेक्षाही जास्त होणार आहे. उपचार करण्यासाठी एवढा सारा खर्च करणे अशक्य असल्यामुळे मदतीची गरज आहे. सर्वमला जन्मापासूनच या आजाराने घेरले आहे. सुरुवातीचे सहा महिने त्याला कोणताही त्रास झाला नाही. मात्र, त्यानंतर त्रास होऊ लागला. त्यावेळी हात-पाय न हलविणे तसेच मानेची समस्या येऊ लागली. यासाठी बेळगाव शहरातील बहुतांशी बालरोग तज्ज्ञांकडे त्यांनी उपचार घेतले. त्यावेळी एमआरआय स्नॅनिंगमधूनही त्याच्या दुर्मिळ आजाराचे निदान झाले नाही.
यावेळी रक्ताचे नमुने हैद्राबादला पाठवून देण्यात आले. त्यानंतर या दुर्मिळ आजाराची माहिती त्यांना मिळाली. तरीही यावर त्यांचा विश्‍वास बसला नाही. पुन्हा पुण्यात त्यांनी यावर उपचार घेतले व त्यावेळी पुन्हा रक्ताचे नमुने बंगळूरला पाठवून देण्यात आले. त्यावेळी पुन्हा तोच आजार असल्याची माहिती त्यांना डॉक्टरांनी दिली. हा दुर्मिळ आजार असल्याची माहिती दिली. तसेच येत्या सहा महिन्यात जोलगेन्स्मा नावाचे 16 कोटी रुपयांचे इंजेक्शन देण्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्याच्या वडीलांची परिस्थिती हालाखीची असल्याने इतक्या मोठ्या रकमेचे इंजेक्शन तात्काळ उपलब्धन करून देणे न परवडणारे आहे. सध्या बंगळूर येथे त्याच्यावर उपचार सुरु असून हे इंजेक्शन परदेशातून मागून घ्यावे लागणार आहे. सध्या सर्वम वरचेवर आजारी पडत आहे. जेवताना व बसताना त्यांना त्रास होत आहे. सध्या त्याला स्टीमद्वारे उपचार देण्याची सुचना बालरोगतज्ज्ञांनी केली आहे. त्यानुसार घरात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
उपचारासाठी लागणार तब्बल 16 कोटींचे इंजेक्शन
या दुर्धर आजारावर उपाचार म्हणून Zolgensma नावाच्या इंजेक्शनची गरज आहे. हे इंजेक्शन जगातील सर्वांत महाग इंजेक्शन असून त्याची यूएसमध्ये निर्मिती होते. त्याची किंमत तब्बल 16 कोटी रुपये आहे. हे इंजेक्शन भारतात आणण्यासाठी इम्पोर्ट ड्युटी लागणार असून त्यामुळे या इंजेक्शनची किंमत तब्बल 20 कोटी रुपयांच्या वर जाणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : सर्वम ट्रॉफीचा विजेता Dubai FC; बक्षीस रक्कम उपचारासाठी दिली
शहापूरातील चिमूकल्याला दुर्मिळ आजार; ₹ 16 कोटीच्या मदतीची गरज

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm