abandoned-baby-found-in-karnataka-burn-marks-on-body-indicates-victim-of-black-magic-athani-halyal-belgaum-202110.jpg | बेळगाव : तिचा खून काळ्या जादूसाठी..? | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : तिचा खून काळ्या जादूसाठी..?

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : हल्ल्याळ (ता. अथणी) जवळ बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या बालिकेचा खून काळ्या जादूसाठी झाला आहे का? असा संशय निर्माण झाला आहे. अथणी पोलिसांनी हाच धागा पकडून तपास हाती घेतला आहे. 23 सप्टेंबर रोजी जत-जांबोटी रस्त्याला लागूनच अडीच वर्षीय बालिका बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. तिच्या शरीरावर भाजलेल्या जखमा होत्या. तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 30 सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला आहे. तिची ओळख पटविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.
abandoned-baby-found-in-karnataka-burn-marks-on-body-indicates-victim-of-black-magic-athani-halyal-belgaum.jpg | बेळगाव : तिचा खून काळ्या जादूसाठी..? | belgaum news | belgavkar बेळगावकर
महाराष्ट्र, कर्नाटकात या बालिकेचे छायाचित्र घेऊन पोलीस ओळख पटविण्यासाठी फिरत आहेत. आजतागायत कोणीच आपली मुलगी बेपत्ता आहे, याची तक्रार नोंदविण्यासाठी उत्तर कर्नाटक किंवा पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्याही पोलीस स्थानकाकडे गेले नाहीत. त्यामुळेच काळ्या जादूसाठी या बालिकेचा बळी दिला असावा का? असा संशय बळावत चालला आहे.
बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्याशी संपर्क साधला असता खुनाचा छडा लावण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. मृतदेहाची ओळख पटल्यानंतरच खून कोणी केला? काळ्या जादूसाठी तिचा बळी दिला आहे का? याचा उलगडा होणार आहे. याबरोबरच आणखी कोणती कारणे आहेत का? हे सामोरे येणार आहे, असे त्यांनी सांगितले.