muslim-convert-radicalised-arrow-bow-rampage-norway-danish-attacker-killed-four-women-and-a-man-aged-202110.jpeg | मॉलमध्ये धनुष्यबाणाने 5 जणांची हत्या, इस्लाम धर्म स्वीकारलेल्या माथेफिरूला पोलिसांनी… | belgaum news | belgavkar बेळगावकर

मॉलमध्ये धनुष्यबाणाने 5 जणांची हत्या, इस्लाम धर्म स्वीकारलेल्या माथेफिरूला पोलिसांनी…

belgavkar.com | belgaum | belgavkar

धनुष्य बाण घेऊन एका मॉलमध्ये घुसलेल्या माथेफिरूने एकामागोमाग एक सटासट बाण सोडले. त्याच्या या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. नॉर्वेतील कोंग्सबर्ग शहरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी हल्लेखोराचं वय 37 वर्षांच्या आसपास असावं असा अंदाज वर्तवला आहे. हल्लेखोराचं पहिलं नाव डॅन असल्याचीही त्यांना माहिती मिळाली आहे. डॅनने इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि त्याच्या कट्टर धार्मिक विचारधारेमुळे पोलिसांनी त्याला चिन्हांकीत केला होता.
नॉर्वेतील प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 6.12 वाजता डॅन एका सुपरमार्केटमध्ये घुसला होता. घुसता क्षणीच त्याने बाण चालवायला सुरुवात केली. त्याच्या या हल्ल्यात 5 जण मृत्यूमुखी पडले असून यात 4 महिलांचा समावेश आहे. या हल्ल्यात एक वयोवृद्ध व्यक्तीही मृत्यूमुखी पडली असून तिचं वय 50 ते 70 च्या दरम्यान असावं अशी माहिती मिळाली आहे. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच ते 6.18 वाजता सुपरमार्केटमध्ये पोहोचले होते. पोलिसांनी डॅनला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्यावरही बाण चालवले आणि तो तिथून पळून गेला. यानंतर पोलिसांनी त्याच्या शोधासाठी मोहीम राबवली होती, ज्यामुळे तो 6.47 मिनिटांनी पोलिसांच्या हाती लागला होता.