sunny-deol-announces-gadar-2-poster-to-be-released-tomorrow-202110.jpeg | Gadar 2 : पुन्हा चित्रपटात झळकणार | belgaum news | belgavkar बेळगावकर

Gadar 2 : पुन्हा चित्रपटात झळकणार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बॉलीवुडचे सुपरस्टार सनी देओल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून त्यांचा कोणताही चित्रपट झळकलेला नाही. मात्र आता लवकरच मोठ्या पडद्यावर त्यांची दमदार एंट्री होणार आहे, अशी चर्चा होती. त्यावर सनी देओल यांनी स्वत:च शिक्कामोर्तब केले आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटमधून स्पष्ट होत आहे की बड्या पडद्यावर झळकण्यासाठी त्यांनी आपल्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सीक्वल निवडला आहे. सनी देओल यांनी त्यांचा सुपरहिट चित्रपट गदरची घोषणा केली आहे.
15 ऑक्टोबर रोजी यासंदर्भात आणखी काही माहिती समोर आणली जाणार आहे. या चित्रपटाचे नाव देखील अजून समोर आलेले नाही.
Announcing Something very special and close to my heart tomorrow at 11 am. Watch this space tomorrow. — Sunny Deol (@iamsunnydeol) October 14, 2021
सनी देओलने आपल्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी एक पोस्टर देखील शेअर केले आहे. ज्यामध्ये 2 हा आकडा स्पष्ट लिहिला आहे आणि त्यासोबत The Katha Continue.. असे शब्द आहेत. यावरून हा गदरचा सीक्वल असल्याचे कळते आहे. तर ट्विट मध्ये त्यांनी लिहिले आहे की ‘उद्या सकाळी 11 वाजता अत्यंत विशेष आणि माझ्या हृदयाजवळ असलेल्या गोष्टीची घोषणा करणार आहे. उद्या याच जागी भेट द्या’.
सनी देओल लवकरच आर बाल्की यांच्या थ्रिलर चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत पूजा भट्ट आणि श्रेया धन्वंतरी देखील मुख्य भूमिकेत दिसतील. महत्त्वाचे म्हणजे सनी देओल आणि पूजा भट्ट 1995 रिलिज झालेल्या ‘अंगरक्षक’ आणि 1997 मध्ये प्रसिद्घ झालेला चित्रपट ‘बॉर्डर’ मध्ये एकत्र होते. सनी देओल याआधी 2011 मध्ये चित्रपट ‘यमला पगला दीवाना’ मध्ये देखील झळकले होते.