अहो दसरा आलाय… सोन्याच्या भावात हजारोंची लक्षणीय वाढ

belgavkar.com | belgaum | belgavkar

गेल्या काही दिवसांपासून मंदावलेल्या सोन्या-चांदीच्या दरांनी आता वाढीच्या दिशेने प्रवास सुरु केलेला दिसून येत आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात घसरणीची मालिका दिसून आली होती. मात्र आता सोने-चांदीच्या दरात हजारोंची वाढ झालेली दिसून येत आहे.
बेळगाव शहरातील सराफा बाजारात दसऱ्याच्या मुहूर्तावर आज ग्राहकांची चांगलीच गर्दी झालेली दिसून आली. शहरातील सराफ्यात आज सोन्याचे भाव ₹ 49527 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवले गेले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 62915 रुपये एवढे नोंदले गेले. कालच्या पेक्षा सोन्याच्या दरात 900 ते 1000 रुपयांची वाढ झाली असून चांदीच्या दरातही काही अंशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
बाजारात आपट्याची सोन्या-चांदीची पानं : विजयदशमीच्या मुहूर्तावर म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी काही घरांमध्ये जावयाला सोन्या-चांदीची पानं देण्याची प्रथा आहे. त्यानिमित्त सराफा बाजारात विविध आकारातील तसेच वजनानुसार सोने आणि चांदीची आपट्याची पानं विक्रीसाठी आली आहेत. नवरात्रीदरम्यान जास्तीत जास्त शुद्ध सोनं विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो. मात्र दसऱ्याच्या एक दिवस आधी ही खास आपट्याची पानं खरेदी करणारा ग्राहक वर्गही दिसतोच.