बेळगाव : कामगारांचे पैसे घेऊन कंत्राटदार फरार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. गोकाक : गोकाकनजीकच्या रिध्दी सिद्धी मका प्रक्रिया कारखान्याच्या रोजंदारी कामगारांचा दोन महिन्यांच्या वेतनाची सुमारे 1.5 लाखाची रक्कम कामगारांना न देता उत्तर प्रदेश मिरत येथील कंत्राटदार बंधूंनी परस्पर लांबवली आहे. या प्रकरणी गोकाक शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रिध्दी सिध्दी मका प्रक्रिया कारखान्यास रोजंदारीवर कामगार मिळवून देण्याचे कंत्राट उत्तर प्रदेश मिरत येथील शबीर अली अन्वरअली खान व त्याचा भाऊ अरिफ अली खान यांना देण्यात आले होते. गत एप्रिल व जून या दोन महिन्यांच्या वेतनाचे ₹ 1,49,536 रुपये कामगारांना न देताच ते फरारी झाले. त्यामुळे रोजंदारी कामगारांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. याविरुद्ध महलिंग गंगाप्पा कळ्ळीमनी यांनी तक्रार दाखल केली आहे. गोकाक परिसरातील 24 कामगार या दोघा बंधूंकडे काम करत होते.