ashok_pujari_politician.jpeg | बेळगाव : काँग्रेसच्या वाटेवर | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : काँग्रेसच्या वाटेवर

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव जिल्ह्यातील निजद (जेडीएस) नेते अशोक पुजारी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली आहे. उत्तर कर्नाटकात निजदसाठी अशोक पुजारी हे महत्त्वाचे प्रस्थ आहे. लिंगायत समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पुजारी यांचे गोकाक परिसरात वजन आहे.
स्वच्छ प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू असून काही दिवसांपूर्वी त्यांनी बंगळूर येथे सिद्धरामय्या आणि बेळगावात डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली. त्यामुळे लवकरच ते काँग्रेस प्रवेश करणार असल्याचे समजते. गोकाक मतदारसंघात माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने ही रणनिती आखली आहे. चारवेळा गोकाक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे. अनिवार्य कारणास्तव पक्ष बदल करावा लागला आहे. गोकाक तालुक्यातील राजकीय व्यवस्था बदलण्यासाठी आपण नागरिकांचे मत घेऊनच पक्ष बदलत आहे, असे त्यांनी सांगितले.