bollywood-nora-fatehi-summoned-ed-200-crore-rupees-money-laundering-case-202110.jpeg | ₹ 200 कोटी रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग प्रकरण, नोरा फतेहीला EDचं समन; | belgaum news | belgavkar बेळगावकर

₹ 200 कोटी रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग प्रकरण, नोरा फतेहीला EDचं समन;

belgavkar.com | belgaum | belgavkar

'या' अभिनेत्रीची पुन्हा होणार चौकशी

तिहार कारागृहात असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन बजावले आहे. नोराला समन जारी करत, या प्रकरणात आज चौकशीसाठी हजर होण्यास सांगण्यात आले आहे. यासंदर्भात ED तिचा जबाब नोंदवणार आहे. सुकेशवर केवळ नोरा फतेहीचीच नव्हे तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही फसवणूक केल्याचा आरोप आहे. नोरा फतेहीसोबतच ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसलाही पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.
ईडीने जॅकलीनला एमटीएनएल येथील ईडी कार्यालयात उद्या म्हणजेच शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले आहे. सुकेशने जॅकलिनलाही त्याच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न केला होता. ईडीने या प्रकरणात या पूर्वीही जॅकलीनची चौकशी केली होती. आधी, जॅकलीनही या प्रकरणात सामील असावी, असे ईडीला वाटत होते. मात्र, नंतर ती स्वतःच या प्रकरणातील विक्टिम असल्याचे समोर आले. सुकेशने लीना पॉलच्या माध्यमाने जॅकलिनची फसवणूक केली होती. जॅकलीनने ईडीला दिलेल्या आपल्या पहिल्या जबाबात सुकेशशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी शेअर केली होत्या.
अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज होणाऱ्या चौकशीसाठी नोरा सहभागी होणार की नाही, हे अद्याप निश्चित नाही. सुकेश चंद्र शेखर आणि त्याची कथित पत्नी अभिनेत्री लीना पॉल, 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिहार कारागृहात आहेत. बोलले जाते, की इतर लोकांप्रमाणेच सुकेशने नोरा फतेहीलाही त्याच्या जाळ्यात अडकविण्याचा कट रचला होता. नोरा आणि जॅकलिन व्यतिरिक्त सुकेशच्या निशाण्यावर अनेक बॉलिवूड कलाकार आणि चित्रपट निर्माते होते.