दोन दिवसांनी आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ;
देशातील सर्वाधिक दर मुंबईत

belgavkar.com | belgaum | belgavkar

दोन दिवसांच्या ब्रेकनंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. यापूर्वी बुधवारी आणि मंगळवारी तेलाच्या किमती स्थिर होत्या. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत 35-35 पैशांची प्रति लिटर वाढ झाली आहे. दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल 104.79 रुपये प्रति लिटर विकलं जात आहे. तर डिझेलची किंमत 93.54 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 110.75 रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेलची किंमत 101.40 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. पाटनामध्येही पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. पेट्रोल 108.04 प्रति लिटर, तर डिझेल 100.07 प्रति लिटरनं विकलं जात आहे. 
कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 105.43 रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेलचे दर 96.63 रुपये प्रति लिटर आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.10 रुपये प्रति लिटर दरानं, तर डिझेल 97.93 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. चंडीगढमध्ये पेट्रोल 100.86 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.34 रुपये प्रति लिटरनं विकली जात आहे. 
देशातील महत्त्वाची शहरं पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
दिल्ली  104.79 93.54
मुंबई  110.75 101.40
कोलकाता  105.43 96.63
चेन्नई  102.10 97.93
पेट्रोल-डिझेलच्या दरांत का होतेय सातत्यानं वाढ?  जगभरात कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशातच पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, परंतु, उत्पादन मात्र कमी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओपेक देशांची बैठक पार पडली, त्यामध्ये दररोज केवळ 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. जेव्हा जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, त्यावेळी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होणं, सामान्य बाब आहे. 
देशात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलनं ओलांडली शंभरी : देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपयांच्या पार पोहोचले आहेत. जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, नागालँड, पुडुचेरी, तेलंगाना, पंजाब, सिक्किम, उडीसा, केरल, तमिलनाडु, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लिटरच्या पार आहेत. 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

दोन दिवसांनी आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ; देशातील सर्वाधिक दर मुंबईत

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm