londha-goa-railway-track-death-leopard-bibtya-death-railway-202110.jpg | लोंढा-गोवा रेल्वे मार्गावर बिबट्या ठार | belgaum news | belgavkar बेळगावकर

लोंढा-गोवा रेल्वे मार्गावर बिबट्या ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

रेल्वेच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना गोवा राज्याच्या हद्दीतील कुळये आणि काळे या दोन गावांच्या मध्ये दोन दिवसांपूर्वी घडली. रात्रीच्या वेळी रेल्वे रूळ ओलांडताना बिबट्याला रेल्वेची धडक बसली. त्यात त्याचा मृत्यू बिबट्या. झाला. याबाबत गोवा वन खात्याने घटनेचा पंचनामा केला आहे. लोंढा-गोवा रेल्वे मार्गावर ही घटना घडली.
यापूर्वीही रेल्वेच्या धडकेत गवे, सांबर, बिबटा मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या ये-जा करण्याची ठिकाणे निश्चित करून रेल्वे लाईनवर ठिकठिकाणी सुरक्षित भुयारी मार्ग निर्माण करणे आवश्यक बनले आहे.