belgaum-tilakwadi-police-seige-11-two-wheelers-seized-one-arrested-202110.jpg | बेळगाव : 11 दुचाकी जप्त; टिळकवाडी पोलिसांनी केले एकाला अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : 11 दुचाकी जप्त; टिळकवाडी पोलिसांनी केले एकाला अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : टिळकवाडी पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडील अंदाजे ₹ 9 लाख रुपये किंमतीच्या चोरीच्या 11 दुचाकी जप्त केल्या. बेळगाव शहरासह आसपासच्या विविध भागातून या दुचाकी चोरल्या आहेत. पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन, पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, खडेबाजार उपविभागाचे एसिपी चंद्रप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडी सीपीआय राघवेंद्र हवालदार व सहकार्‍यांनी ही कारवाई केली. मकाबुला अहमद अस्लम मेहबूसाबा बिकनाबाई (वय 27, रा. बीरबल गल्ली हुबली सध्या ओल्ड हुबली) या चोरट्यावर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.