महाराष्ट्र : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार घालताना आमदारांकडून गंभीर चूक; व्हायरल व्हिडीओनंतर माफी मागितली

महाराष्ट्र : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार घालताना आमदारांकडून गंभीर चूक;
व्हायरल व्हिडीओनंतर माफी मागितली

belgavkar.com | belgaum | belgavkar

व्हायरल व्हिडीओनंतर माफी मागितली

महाराष्ट्र - हिंगोली : वसमत शहरातील बहुप्रतिक्षीत असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आज अखेर वसमत शहरात दाखल झाली. तेव्हा ही मूर्ती ट्रकमध्ये असल्यामुळे वसमत विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी अश्वावर उभे राहून छत्रपती शिवाजी महाराज यांना हार अर्पण केला आहे. हा व्हिडीओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि आमदार नवघरे यांच्यावर टीका झाली आहे. त्यानंतर आपली चूक लक्षात येतात त्यांना अश्रू अनावर झाले आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आपली चूक लक्षात आल्यानंतर आमदार राजू नवघरे यांनी माध्यमांसमोर येत माफी मागितली आहे. माध्यमांशी बोलताना आमदार नवघरे यांना रडू देखील कोसळले. 'मी एकट्यानेच पाप केले असेल तर मला फाशी द्या. अनेक जण माझ्यासोबत शिवाजी महाराजांना हार घालण्यासाठी घोड्यावर चढले तर टीकेची झोड माझ्यावरच का? असा सवाल देखील त्यांनी या वेळी उपस्थित केला. 'माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा', अशा शब्दात राजू नवघरे यांनी सर्व शिवप्रेमींची माफी सुद्धा मागितली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

महाराष्ट्र : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार घालताना आमदारांकडून गंभीर चूक; व्हायरल व्हिडीओनंतर माफी मागितली
व्हायरल व्हिडीओनंतर माफी मागितली

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm