belgaum-anradha-powdwal-belgaum-pant-balekundri-temple-202110.jpg | बेळगाव : अनुराधा पौडवाल यांची बेळगावच्या 'या' देवस्थानाला भेट | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : अनुराधा पौडवाल यांची बेळगावच्या 'या' देवस्थानाला भेट

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : 1990s मधील प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल गेल्या अनेक वर्षांपासून म्यूझिक वर्ल्डपासून दूर आहेत. मराठी आणि हिंदी गीतांच्या गायिका तसेच भक्ती गीतांनी रसिकांच्या मनावर मोहिनी निर्माण केलेल्या पद्मश्री अनुराधा पौडवाल यांनी आज बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री येथील अवधूत सांप्रदायाचे प्रणेते सद्गुरू श्रीपंत महाराज बाळेकुंद्री देवस्थानाला भेट दिली.
अनुराधा पौडवाल यांनी स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं. इतकं की नव्वदच्या दशकात बॉलिवूडच्या जवळपास प्रत्येक सिनेमांमध्ये अनुराधा पौडवाल यांचे एक तरी गाणे असायचेच. पण अचानक काही वर्षानंतर अनुराधा यांनी फिल्मी गाणी गायचे सोडून भक्ती गीत व भजन गायला सुरूवात केली. असं का? असा प्रश्न आजही त्यांच्या चाहत्यांना छळतो.