shardul-thakur.jpeg | माही इफेक्ट...; धोनीचा सल्ला अन् टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघात बदल, जाणून घ्या अंतिम 15 मधून कोणाला मिळाला डच्चू  | belgaum news | belgavkar बेळगावकर

माही इफेक्ट...; धोनीचा सल्ला अन् टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघात बदल, जाणून घ्या अंतिम 15 मधून कोणाला मिळाला डच्चू 

belgavkar.com | belgaum | belgavkar

राखीव खेळाडूंमध्ये असलेल्या शार्दूल ठाकूरला मुख्य संघात स्थान

हार्दिक नव्हे, तर दुसऱ्याच खेळाडूला डच्चू दिला गेला आहे.

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बीसीसीआयनं जाहीर केलेल्या अंतिम 15 जणांच्या ताफ्यात बदल होणार, अशी चर्चा गेली अनेक दिवसांपासून सुरू होती. हार्दिक पांड्याची आयपीएल 2021 मधील निराशाजनक कामगिरी आणि त्याची तंदुरुस्ती हा बीसीसीआयसाठी चिंतेचा विषय ठरला होता. त्यामुळे त्याच्या नावावर फुल्ली मारली जाईल असा अंदाज होता. बीसीसीआयनं बुधवारी अखेर ट्वेंटी-20 वर्ल्ड कप संघात बदल झाल्याचे जाहीर केले. राखीव खेळाडूंमध्ये असलेल्या शार्दूल ठाकूरला मुख्य संघात स्थान देण्यात आले आहे. पण, त्याच्यासाठी हार्दिक नव्हे, तर दुसऱ्याच खेळाडूला डच्चू दिला गेला आहे.
बीसीसीआयनं बुधवारी शार्दूलच्या समावेशाची माहिती देताना फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवल्याची घोषणा केली. टीम इंडियाच्या निवड समितीनं संघ व्यवस्थापनाशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. अष्टपैलू अक्षर पटेल हा टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात होता, परंतु तो आता राखीव खेळाडू म्हणून संघासोबत असणार आहे. शार्दूलच्या समावेशामुळे वर्ल्ड कप संघात हार्दिक आता फक्त फलंदाज म्हणून असणार आहे. महेंद्रसिंग धोनी हा या संघाचा मेंटॉर असणार आहे आणि त्यानं शार्दूल ठाकूरसाठी बीसीसीआयकडे शब्द टाकल्याची चर्चा सुरू आहे. शार्दूलनं गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही कमाल दाखवली आहे. त्यामुळे हार्दिक पूर्णपणे तंदुरूस्त न झाल्यास शार्दूल ठाकूर हा सक्षम पर्यात विराट कोहलीकडे असणार आहे.
भारतीय संघ - विराट कोहली , रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल

भारतीय संघाला सरावात मदत करणारे खेळाडू - आवेश खान, उम्रान मलिक, हर्षल पटेल, लुकमन मेरीवाला, वेंकटेश अय्यर, कर्ण शर्मा, शाहबाज अहमद, के गौथम. 
पात्रता फेरीत सहभागी संघ
गट 1 - श्रीलंका, आयर्लंड, नेदरलॅन्ड, नामिबिया
गट 2 - बांगलादेश, स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी, ओमान
पात्रता फेरीचं वेळापत्रक
17 ऑक्टोबर - ओमान वि. पपुआ न्यू गिनी आणि बांगलादेश वि. स्कॉटलंड
18 ऑक्टोबर - आयर्लंड वि. नेदरलँड्स आणि श्रीलंका वि. नामिबिया
19 ऑक्टोबर - स्कॉटलंड वि. पपुआ न्यू गिनी आणि ओमान वि. बांगलादेश
20 ऑक्टोबर - नामिबिया वि. नेदरलँड्स आणि श्रीलंका वि. आयर्लंड
21 ऑक्टोबर - बांगलादेश वि. पपुआ न्यू गिनी आणि ओमान वि.  स्कॉटलंड
22 ऑक्टोबर - नामिबिया वि. आयर्लंड आणि श्रीलंका वि. नेदरलँड्स
 


सुपर 12 फेरीतील संघ
गट 1 - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, गट एकचा विजेता आणि गट दोनचा उपविजेता.
गट 2- भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट एकचा उपवजेता आणि गट दोनचा विजेता.

सुपर 12 चे वेळापत्रक
ग्रुप 1
23 ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका, दुबई, वेळ दुपारी 3.30 वाजता
इंग्लंड वि. वेस्ट इंडिज, दुबई , वेळ सांयकाळी ७.०० वाजता
24 ऑक्टोबर - अ गटातील अव्वल वि. ब गटातील उपविजेता. शाहजाह, वेळ दुपारी 3.30 वाजता
दक्षिण आफ्रिका वि. वेस्ट इंडिज, दुबई, वेळ दुपारी 3.30 वाजता
27 ऑक्टोबर - इंग्लंड वि. ब गटातील उपविजेता, अबु धाबी, वेळ सायंकाळी 7.30 वाजता
28 ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. अ गटातील अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी 7.30 वाजता
29 ऑक्टोबर - वेस्ट इंडिज वि. ब गटातील उपविजेता, शारजाह, वेळ  दुपारी 3.30 वाजता
30 ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका वि. अ गटातील अव्वल, शाहजाह, वेळ - दुपारी 3.30 वाजता
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, दुबई, सायंकाळी 7.30 वाजता
1 नोव्हेंबर - इंग्लंड वि. अ गटातील अव्वल, शाहजाह, सायंकाळी 7.30 वाजता
2 नोव्हेंबर - दक्षिण आफ्रिका वि. ब गटातील उपविजेता, अबु धाबी, वेळ दुपारी 3.30 वाजता
4 नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया वि. ब गटातील उपविजेता, दुबई, वेळ दुपारी 3.30 वाजता 
वेस्ट इंडिज वि. अ गटातील अव्वल, अबु धाबी, वेळ सायंकाळी 7.30 वाजता
6 नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज, अबु धाबी, वेळ दुपारी 3.30 वाजता
 

ग्रुप 2
24 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी 7.30 वाजता
25 ऑक्टोबर - अफगाणिस्तान वि. ब गटातील अव्वल, शाहजाह, सायंकाळी 7.30 वाजता
26 ऑक्टोबर - पाकिस्तान वि. न्यूझीलंड, शाहजाह, सायंकाळी 7.30 वाजता
27 ऑक्टोबर - ब गटातील अव्वल वि. अ गटातील उपविजेता, अबुधाबी, वेळ सायंकाळी 7.30 वाजता
29 ऑक्टोबर - अफगाणिस्तान वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी 7.30 वाजता
2 नोव्हेंबर - पाकिस्तान वि. अ गटातील उपविजेता, अबु धाबी, सायंकाळी 7.30 वाजता
3 नोव्हेंबर - न्यूझीलंड वि. ब गटातील अव्वल, दुबई, दुपारी 3.30 वाजता
भारत वि, अफगाणिस्तान, अबु धाबी, वेळ सायंकाळी 7.30 वाजता
5 नोव्हेंबर - भारत वि. ब गटाती अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी 7.30 वाजता
7 नोव्हेंबर - न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान, अबु धाबी, दुपार 3.30 वाजता
पाकिस्तान वि. ब गटातील अव्वल, शाहजाह, सायंकाळी 7.30 वाजता
8 नोव्हेंबर - भारत वि. अ गटातील उपविजेता, दुबई, सायंकाळी 7.30 वाजता
उपांत्य फेरीचे सामने  - 10 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर 
अंतिम सामना - 14 नोव्हेंबर