T20 World Cup 2021 : ट्वेन्टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची नवी जर्सी लाँच;

belgavkar.com | belgaum | belgavkar

काय आहे वैशिष्ट्य पाहा...

T20 World Cup 2021 : आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेचे पडघम वाजू लागले आहेत. संयुक्त अरब अमिरात आणि ओमानमध्ये ट्वेन्टी-29 विश्वचषक स्पर्धेला 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ नव्या जर्सीसह खेळताना दिसणार आहे. भारतीय संघाच्या नव्या जर्सीचं आज अनावरण करण्यात आलं आहे.  बीसीसीआयनं काही दिवसांपूर्वी भारतीय संघ ट्वेन्टी-29 विश्वचषक स्पर्धेत नव्या जर्सीत दिसेल असं सांगितलं होतं. त्यानुसार आज नव्या जर्सीचं अनावरण सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.
यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, अष्टपैलू रविंद्र जडेजा, गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज केएल राहुल यांनी नवी जर्सी परिधान केल्याचा फोटो शेअर करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या याआधीच्या जर्सीपेक्षा नवी जर्सी काहीशी वेगळी आहे. भारतीय संघाच्या जर्सीतला निळा रंग कायम ठेवण्यात आला असला तरी त्यावरील डिझाइन बदलण्यात आलं आहे. गडद नीळ्या रंगातील जर्सीवर फिकट निळ्या रंगाच्या हलक्या रेषांचं डिझाइन जर्सीवर देण्यात आलं आहे. याआधीच्या जर्सीमध्ये खांद्यावर तीन रंगांचा एक पट्टा देण्यात आला होता. तो नव्या जर्सीतून काढून टाकण्यात आला आहे. 
असा आहे टीम इंडियाचा कार्यक्रम : भारतीय संघ विश्वचषकात 'ग्रूप-बी' मध्ये खेळणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध रंगणार आहे. त्यानंतर भारतीय संघाचा सामना 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध खेळवला जाणार आहे. दोन्ही सामने दुबईच्या स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहेत. त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तान विरुद्ध अबूधाबीच्या मैदानात भारतीय संघ खेळणार आहे. 
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय टीम
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
स्टँडबाय : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर
प्रशिक्षक : रवि शास्त्री 
मेंटर : एमएस धोनीटी20 विश्वचषकात भारताचे सामने
भारत vs पाकिस्तान - 24 ऑक्टोबर, 7:30 PM IST, दुबई
भारत vs न्यूजीलैंड- 31 ऑक्टोबर, 7:30 PM IST, दुबई
भारत vs अफगाणिस्तान- 03 नोव्हेंबर, 7:30 PM IST, अबू धाबी
भारत vs बी1- 05 नोव्हेंबर, 7:30 PM IST, दुबई
भारत vs ए2- 08 नोव्हेंबर, 7:30 PM IST, दुबई
सेमीफाइनल 1- 10 नोव्हेंबर, 7:30 PM IST, अबू धाबी
सेमीफाइनल 2- 10 नोव्हेंबर, 7:30 PM IST, दुबई
फाइनल- 14 नवंबर, 7:30 PM IST, दुबई.
T20 WORLD CUP
TEAM INDIA
TEAM INDIA JERSEY
TEAM INDIA NEW JERSEY
ICC T20 WORLD CUP 2021