बेळगाव : त्या कुटुंबाला 'ऑपरेशन मदत ग्रुप' तर्फे मदत

बेळगाव : त्या कुटुंबाला 'ऑपरेशन मदत ग्रुप' तर्फे मदत

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : अवचारहट्टी येथे आठवड्यापूर्वी सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मजूर कुटुंबाला 'ऑपरेशन मदत ग्रुप' तर्फे जीवनावश्यक साहित्य वितरण करण्यात आले. सर्पदंशाने गजानन मेलगे यांचा शेतात काम करताना मृत्यू झाला. मेलगे कुटुंबाची जबाबदारी गजानन यांच्यावरच होती. त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुली, मुलगा, अर्धांगवायू झालेली आई व अपंग भाऊ असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत माहिती मिळताच ऑपरेशन मदत ग्रुपने मदतीसाठी धाव घेतली. सतीश पाटील, भालचंद्र पाटील, डॉ. समीर शेख, सम्राट पाटील, नागेंद्र लोहार, शुभम हुली, संतोष दरेकर, प्रसाद हुली, राहुल पाटील यांच्यातर्फे जीवनावश्यक साहित्य वितरण करण्यात आले. तीन मुलांच्या शिक्षणासाठी दीपक औलकर, गौरी गजबर, सुलक्षणा सुतार, श्रेष्टा फाऊंडेशन यांनी पुढाकार घेतला असून कुटुंबाला दानशूर व्यक्ती व संस्थांनी मदत करावी, असे आवाहन राहुल पाटील यांनी केले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : त्या कुटुंबाला 'ऑपरेशन मदत ग्रुप' तर्फे मदत

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm