बेळगाव दक्षिणमध्ये आमदार जारकीहोळी

बेळगाव दक्षिणमध्ये आमदार जारकीहोळी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी शुक्रवारी बेळगाव दक्षिण मतदारसंघाला भेट देऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. बेळगाव महापालिका निवडणुकीनंतर या भागाला भेट देण्याचा निश्चय केला होता. त्यानुसार मी पाच प्रभागांना भेट देत आहे. पुढील दिवसांत मतदारसंघातील प्रत्येक प्रभागाला भेट देऊन समस्या जाणून घेणार आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीत आम्हाला अपयश आले असले तरी त्याबद्दल खेद न मानता जनतेच्या पाठीशी राहणार आहे. जनतेने आपल्या काही समस्या असल्यास त्या उघडपणे मांडाव्यात. त्या सोडविण्याचा प्रयत्न करु, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे मुख्य सचिव प्रदीप एम जे., दक्षिण मतदारसंघ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अजप्पा ढगे, परशुराम ढगे फजल मकानदार, राघू भोवी, आनंद शिरुर, सलीम सनदी, इरफान अत्तार, आकाश करोशी, सागर सातपुते, रेखा सोनटक्की यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव दक्षिणमध्ये आमदार जारकीहोळी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm