बेळगाव : ये ऊठ, तुला मरायचं नाही, तुझ्यासाठी  आलोय मर्दा

बेळगाव : ये ऊठ, तुला मरायचं नाही, तुझ्यासाठी आलोय मर्दा

belgavkar.com | belgaum | belgavkar

पक्ष्यांच्या जीवावर मांजा - पतंग उडवताय, सावधान, खबरदारी घ्या

बेळगाव : 'ये ऊठ, तुला मरायचं नाही. तुझ्यासाठी आलोय मर्दा,' अशी हाक देत 'हा माझा धर्म पशू बचाव संघटने'च्या विनायक केसरकर ऊर्फ बजरंगी भाईजान यांनी घारीला आज जीवदान दिले. झाडावर मांज्याला अडकलेल्या घारीची त्यांनी सहीसलामत सुटका केली. दसरा हा सण आला की मुलांना पतंग आभाळात उडविण्याचा मोह आवरत नाही. आवश्य मुलांनी पतंग उडवावा. पण आज वर्तमान युगात घातक ठरत असलेला धागा म्हणजे मांजा. याचा वापर सर्रास होताना दिसत आहे.
तर या मांजा धाग्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. निष्पाप, मुक पक्षी देखील याला अपवाद नाहीत. आज काकती येथे झाडावर मांजा या धाग्यात गुंफून एक घार तेथे तडफडत होता. श्रीनिवास कोचेरी यांनी हा माझा धर्म पशू बचाव संघटनेच्या विनायक केसरकर यांना याबाबत महिती दिली. त्यांनी त्या घारीचा जीव जाण्यापासून रोखले आणि त्याच्या जखमेवर उपचार करुन वन अधिकाऱ्यांच्या साक्षीने ती घार सोडण्यात आली. सुरज गवी, अनिल गवी आणि श्रीधर बाळेकुंद्री यांनी मदत केली. तर सर्व मुलांना आमचा हाच संदेश आहे की, पंतंग उडवा पण स्वतःच्या तसेच त्या निष्पाप पक्षांच्या जीवाशी न खेळता उडवा. घातक मंजाचा वापर न करता सुती धाग्याच्या वापर करावा.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : ये ऊठ, तुला मरायचं नाही, तुझ्यासाठी आलोय मर्दा
पक्ष्यांच्या जीवावर मांजा - पतंग उडवताय, सावधान, खबरदारी घ्या

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm