बेळगाव : आजी-आजोबांनी लुटला जलविहार आनंद

बेळगाव : आजी-आजोबांनी लुटला जलविहार आनंद

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव शहरातील शांताई वृद्धाश्रमाततर्फे बोटीतून जलविहार करण्याच्या उपक्रमाचे आयोजन करून आश्रमातील आजी -आजोबांना एक वेगळाच आनंद मिळवून देण्यात आला. वृद्धाश्रमाच्या चार भिंतीमध्ये आयुष्याची संध्याकाळ व्यतीत करणाऱ्या निराधार आजी-आजोबांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलवण्यासाठी शांताई वृद्धाश्रमाततर्फे सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असतात.
याचाच एक भाग म्हणून शांताई वृद्धाश्रमाचे पदाधिकारी माजी महापौर विजय मोरे यांच्या पुढाकाराने वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना बेळगाव शहरातील किल्ला तलावामध्ये बोटीतून जलविहार करण्याचा आनंद मिळवून देण्यात आला. जलविहार याचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी जल विहाराच्या या उपक्रमाबद्दल व्यवस्थापन मंडळाला धन्यवाद दिले. किल्ला तलावातील जलविहार याप्रसंगी आजी-आजोबांसमवेत ॲलन विजय मोरे यांच्यासह शांताई वृद्धाश्रमाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : आजी-आजोबांनी लुटला जलविहार आनंद

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm