IPL मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, हा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

belgavkar.com | belgaum | belgavkar

आज होणार आहे सनराइजर्स हैदराबाद Vs दिल्ली मॅच; होणारा सामना ठरल्याप्रमाणे पार पडेल.

Sunrisers Hyderabad vs Delhi : Sunrisers Hyderabad's T Natarajan Tests Covid Positive

मोठ्या अंतरानंतर यूएईमध्ये सुरु झालेल्या आयपीएलमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळे बीसीसीआय (BCCI) आणि आयपीएल (IPL) मॅनेजमेंटच्या चिंता वाढल्या आहेत. सनराइजर्स हैदराबादचा खेळाडू गोलंदाज टी नटराजन कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेले 6 खेळाडू आयसोलेशनमध्ये आहेत. कोरोनाचा कोणताही परिणाम सामन्यावर होणार नाही. हा सामना ठरलेल्या वेळेप्रमाणे होणार आहे.
आइसोलेट : विजय शंकर (प्लेयर), विजय कुमार (टीम मैनेजर), श्याम सुंदर (फीजियो), अंजना वन्नन (डॉक्टर), तुषार खेडकर (लॉजिस्टिक मैनेजर), पीए. गणेशन (नेट बॉलर)
यामुळे आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये होणारा सामना ठरल्याप्रमाणे पार पडेल.
सनरायजर्स हैदराबादचा आज दिल्ली कॅपिटल्ससोबत सामना होणार आहे. कोरोनामुळे आयपीएल स्थगित केल्यानंतर पुन्हा एकदा दुबईत खेळलं जात असून हैदराबादचा हा पहिलाचा सामना आहे. दरम्यान टी नटराजनसोबत हैदराबादचा आणखी एक खेळाडू विजय शंकर आणि पाच सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. हे सर्वजण टी-नटराजनच्या संपर्कात आले होते अशी माहिती देण्यात आली आहे. आयपीएलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार पहाटे पाच वाजता जवळच्या संपर्कातील आणि इतरांची आरटीपीसीआर टेस्ट केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यामुळे आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये होणारा सामना ठरल्याप्रमाणे पार पडेल. टी-नटराजनच्या संपर्कात आलेले ते सहाजण ज्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.