बेळगाव : गणेश विसर्जन मिरवणूक; चाकू हल्ला;

बेळगाव : गणेश विसर्जन मिरवणूक;
चाकू हल्ला;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. चिकोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील सदलगा येथे काल मंगळवारी रात्री उशिरा (20 सप्टेंबर, 13 दिवस गणपती) झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी कोल्हापूरातील एका तरुणावर चाकूने वार करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कुर्ली गावातील रहिवासी विशाल कृष्णा शिवडे (वय 27) याला अनोळखी व्यक्तींनी चाकूने भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
साधारणपणे रात्री साडेआठच्या सुमारास मंडळांच्या गणेशमूर्तीं ट्रॅक्टर ट्रॉली मधून वाद्यांचा दणदणाटात रस्त्यावर आल्या. शहराच्या प्रमुख मार्गाने मिरवणूक जात होती. प्रभाकर गार्डन परिसरातील कल्पवृक्ष सोसायटीच्या परिसरात मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या अंदाजे चार - पाच परगावच्या तरुणांमध्ये वाद होऊन त्यांच्याचपैकी एका तरुणावर चाकूहल्ला झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशालला बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सरकारचा बंदी आदेश असूनही गणेश विसर्जनादरम्यान डॉल्बी डीजेचा वापर करण्यात आला. डॉल्बी साउंड सिस्टीम पाहण्यासाठी कोल्हापूर येथून विशाल सदलगा येथे आला होता. यावेळी तरुणावर अज्ञाताने चाकूने वार केले.
हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही आणि कुणी कशासाठी हल्ला केला हेही कळले नाही. घटनेचा सदलगा पोलिस पुढील तपास करत आहेत. रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली, तात्काळ पोलिसांनी फौजफाट्यासह घटनास्थळी येऊन गर्दी पांगवली. हजारोंच्यावर नागरिक मिरवणुकीत सहभागी होते. सदलग्यातील प्रत्येक मंडळांचे दीडशे कार्यकर्ते गृहीत धरल्यास एकूण हजार पंधराशे कार्यकर्त्यांची संख्या होऊ शकते. मिरवणुकीतील गर्दी पाहता परगावच्या सहभागींची, बघ्यांचीच संख्या जास्त होती. रस्त्याच्या दुतर्फा मोटारसायकली खेटून पार्क केलेल्या दिसत होत्या. घटनेनंतर सदलगा पोलिस आल्यावर अर्ध्या तासात संपूर्ण सदलगा शहर सामसूम झाले होते.
सदलग्यातील सर्व मंडळानी एकत्र येऊन एकाच मिरवणूकीत सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन शांततेत पण आनंदात करण्याचे ठरविले होते. आणि त्याचप्रमाणे मिरवणुकीत तरुणाई आनंदाने थिरकत मिरवणूक संथ गतीने जात होती. परगावच्या तरुणांनी येऊन शांततेत जाणाऱ्या विसर्जन मिरवणूकीत हे दुष्कृत्य केल्याने सदलग्यातील शांततेत निघालेल्या मिरवणूकीला गालबोट लागले. यामुळे सर्व मंडळांचे कार्यकर्ते नाराज झाले आणि घटनेचे गांभीर्य ओळखून विसर्जन मिरवणूक आटोपती घेतली.
त्या तरुणांच्यात आपापसातील वादातून झालेल्या चाकू हल्ल्यातील पीडीत (विशाल शेवडे) तरुणाला वार गंभीर असल्याने सरकारी रुग्णवाहिकेतून बेळगांव जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते, त्यानंतर त्याला कोल्हापूरमध्ये हलविण्यात आल्याचे समजले. याप्रसंगी सीपीआय आरआर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रविंद्र अज्जन्नवर यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलिस फौजफाटा तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि लगेचच विसर्जन मिरवणूक संपविण्यात आली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : गणेश विसर्जन मिरवणूक; चाकू हल्ला;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm