belgaum-raibag-alaknur-belgaon-boarwell-death-father-murdered-son-202109.jpg | बेळगाव : ...म्हणून निर्दयी बापानेच केला  2 वर्षीय बालकाचा खून | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : ...म्हणून निर्दयी बापानेच केला 2 वर्षीय बालकाचा खून

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. रायबाग : रायबाग तालुक्यातील आलकनूरला कूपनलिकेत (बोअरवेल) पडून मृत्यू झालेल्या बालकाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. गळा आवळून मुलाचा मृतदेह कूपनलिकेत टाकल्याची कबुली पित्याने पोलिसांना दिली. शरद सिद्धाप्पा हसरे (वय 2) असे मयत मुलाचे, तर सिद्धाप्पा बसाप्पा हसरे (वय 26) असे अटक केलेल्या वडिलाचे नाव आहे. हारुगेरी पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पत्नी राजश्रीबरोबर सिद्धाप्पाचे चारित्र्यावरुन वारंवार भांडणे होत. शरद आपला मुलगा नसल्याचा संशय त्याला होता. घरात कोणी नसल्याचे पाहून शुक्रवारी शरदचा शेतात गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह कूपनलिकेत कोंबला. शनिवारी बेपत्ता बालकाचा मृतदेह आढळल्याने व घटनास्थळ घरापासून शेतात लांबवर असल्याने खून करून टाकल्याचा संशय व्यक्त होत होता. सिद्धाप्पाकडे चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. सिद्धाप्पाला अटक करून न्यायालयात हजर केल्यावर हिंडलगा कारागृहात रवानगी केली.
घटनेची फिर्याद राजश्रीची आई सरस्वती अक्कीमरडी (रा. आलखनूर) हिने दिली. अथणीचे पोलिस उपाधीक्षक एस. व्ही. गिरीश, मंडल पोलिस निरीक्षक के. एस. हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हारुगेरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राघवेंद्र खोत व सहकाऱ्यांनी कारवाई केली.