बेळगाव : हिंडलगा येथे सेवा समर्पण अभियान;

बेळगाव : हिंडलगा येथे सेवा समर्पण अभियान;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : भाजप बेळगाव ग्रामीण मंडलच्या वतीने सेवा समर्पण अभियानांतर्गत येथील बाबू जगजीवनराम सभागृहामध्ये सोमवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. रुग्णांची तपासणी करून मोफत औषध वाटप करण्यात आले. नाक, कान, घसा, डोळे मोफत तपासणी करण्यात आली. गरजूंना मोफत चष्मा वितरण, रक्त तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने तपासणी केली.
भाजप बेळगाव ग्रामीण मंडल व प्रभाकर कोरे हॉस्पिटल यांच्या माध्यमातून शिबिर पार पडले. खासदार मंगल अंगडी यांनी दीप प्रज्वलन करून उदघान केले. ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील, मंडल अध्यक्ष धनंजय जाधव, माजी आमदार मनोहर कडोलकर, ग्रा. पं. उपाध्यक्षा भाग्यश्री कोकितकर, अशोक थोरवत, नगरसेवक संदीप जिरग्याळ, रूपा चिकलदिनी, वीणा विजापुरे, राजू देसाई उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राम पंचायत सदस्य रामचंद्र मन्नोळकर यांच्यासह सदस्य व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन पंकज घाडी यांनी केले. आभार उमेश शिंदोळकर यांनी मानले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : हिंडलगा येथे सेवा समर्पण अभियान;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm