hyderabad-police-announce-rs-10-lakh-reward-for-info-on-rape-accused-hyderabad-saidabad.jpeg | 10 लाख रुपयांचे बक्षीस; 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या | belgaum news | belgavkar बेळगावकर

10 लाख रुपयांचे बक्षीस; 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

मंत्री म्हणाले की आरोपीला पकडून एन्काउंटर करणार…

हैदराबाद : तेलंगणामधील हैदराबादमध्ये एका 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे लोक संतापलेले आहेत. प्रत्येकजण आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहे. दरम्यान, तेलंगणा सरकारच्या मंत्र्याने म्हटले आहे की आम्ही त्याला लवकरच शोधून काढू आणि त्याचे एन्काउंटर करू. तेलंगणा सरकारमधील कामगार मंत्री मल्ला रेड्डी यांनी हैदराबादच्या सैदाबादमधील बलात्कार प्रकरणाबाबत लवकरात लवकर न्याय मिळवण्याविषयी सांगितले.
मल्ला रेड्डी यावेळी म्हणाले की, हैदराबादच्या मुलीची हत्या करणाऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, आम्ही त्याला अटक करू आणि मग एन्काउंटर करू. त्यांनी आश्वासन दिले की लवकरच ते पीडित कुटुंबाला भेटतील, त्यांना सर्वप्रकारे मदत करतील. त्यानंतर एन्काउंटरबाबत बोलताना ते म्हणाले की आम्ही आरोपींना सोडणार नाही. हैदराबादमध्ये 9 सप्टेंबर रोजी 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली. मुलीचा मृतदेह एका बंद घरात सापडला होता. 30 वर्षीय आरोपी राजू हा पीडितेचा शेजारी होता. त्याने मुलीशी मैत्री केली होती. पोलीस या प्रकरणात 30 वर्षीय आरोपी राजूचा शोध घेत आहेत, जो शेजारीच राहत होता. पोलिसांनी 15 टीम तयार केल्या आहेत, जे या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश येथेही आरोपींचा शोध सुरू आहे. हैदराबाद पोलिसांनी आरोपींवर 10 लाख रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केले आहे, जेणेकरून आरोपींना लवकरात लवकर पकडता येईल. या प्रकरणामुळे तेलंगणाच्या राजकारणात खळबळ उडाली असून पोलिसांवर लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी दबाव आहे. हैदराबादसह तेलंगणाच्या विविध भागात आता निदर्शने तीव्र होत आहेत. लोकांनी कॅन्डल लाईट मार्च काढून न्याय मिळण्याची मागणी केली आहे.