two-hospital-clinin-sealdown-chikodi-belgaum-certificate-202109.jpg | बेळगाव : दोन हॉस्पिटलसह क्लिनिकला ठोकले टाळे | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : दोन हॉस्पिटलसह क्लिनिकला ठोकले टाळे

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : आरोग्य खात्याने चिकोडीच्या करुनुरे गल्ली, गांधी मार्केटमधील अंजुमन हॉस्पिटल ऍण्ड पटेल क्लिनिकला टाळे ठोकले. सदर हॉस्पिटल व क्लिनिकने केपीएमईए म्हणजेच कर्नाटक प्रायव्हेट मेडिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट (Karnataka Private Medical Establishments (KPME) Act) अंतर्गत नोंदणी केलेली नव्हती. विनापरवाना हॉस्पिटल व क्लिनिक चालविल्यामुळे आरोग्य खात्याने ही कारवाई केली.
नोडल अधिकारी एम. व्ही. किवडसण्णावर, तालुका आरोग्याधिकारी डॉ. व्ही. व्ही. शिंदे, मंजुनाथ बिसनळ्ळी, आरोग्य निरीक्षक एच. ए. वडियार यांनी हॉस्पिटल व क्लिनिकवर धाड टाकून ही कारवाई केली. आरोग्य विभागाने त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची पाहणी केली होती. या तपासणीत नोंदणी प्रमाणपत्र, इतर प्रमाणपत्र आणि सुविधा नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे या रुग्णालयांना मार्च महिन्यात नोटिसा बजावून बंद करण्याचे आदेश महापालिकेने दिले होते.