newly-married-woman-committed-suicide-due-dowry-belgaum-shahapur-alawan-galli-202109.jpg | बेळगाव : हुंड्यासाठी छळ; शहापूरात नवविवाहितेची आत्महत्या | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : हुंड्यासाठी छळ; शहापूरात नवविवाहितेची आत्महत्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : हुंड्यासाठी होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून नवविवाहितेने सासरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. मुस्कान रोहिम कागजी (वय 20, रा. आळवण गल्ली शहापूर) असे तिचे नाव असून याप्रकरणी पतीसह सासरच्या तिघा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
बेळगाव शहरातील खंजर गल्ली येथील मुस्कान हिचा विवाह गेल्या आठ महिन्यांपूर्वी आळवण गल्ली शहापूर येथील रोहिम त्याच्याबरोबर झाला होता. मात्र, गेल्या तीन महिन्यापासून पती व सासरच्या मंडळीने माहेरून पैसे घेऊन ये असे म्हणत तिचा शारीरिक व मानसिक छळ चालविला होता. त्यामुळे तिने ही माहिती आपल्या माहेरी दिली. त्यामुळे मुस्कान हिचा मामा जुबेर मुजावर यांनी पंधरा दिवसापूर्वी मुस्कानच्या घरी जाऊन ₹ 10000 रुपये दिले होते. तरीदेखील आणखी पैसे घेऊन ये असे म्हणत तिचा पुन्हा छळ चालविण्यात आला होता.
तू गळफास घेऊन मर आम्ही आराम राहतो, असे म्हणत तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने तिने घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती समजताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी अकिब मोहम्मदगौस मकानदार (रा. खंजर गल्ली) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.