police-van-siren.jpg | बेळगाव : केएलईजवळ चाकूहल्ला | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : केएलईजवळ चाकूहल्ला

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : मोबाईलवर बोलत रस्त्याने चालत जाणाऱ्या केएलई रुग्णालयातील कर्मचाऱ्यावर अज्ञाताने चाकूहल्ला केल्याची घटना रविवारी सायंकाळी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर घडली आहे. लहू बाळाप्पा कोळीगुडे (वय 35, मूळ रा. चिंचली ता. रायबाग, सध्या रा. मंगाई गल्ली, वडगाव) असे जखमीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, फिर्यादी लहू यांची रविवारी रात्री आठ वाजता नाईट ड्यूटी होती. त्यामुळे, ते वडगावहून रिक्षाने रामदेव हॉटेलनजीक उतरले. तेथील हॉटेलातून जेवणाचे पार्सल घेतले. त्यानंतर ते रस्त्याकडेने मोबाईलवरुन बोलत केएलईकडे चालले होते. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना एका अज्ञाताने गाठून त्यांचा हात पकडला. लहू यांनी माझा हात कशाला धरतोस अशी विचारणा केली. माझे सोने याठिकाणी पडले होते. तू घेतले आहेस, असे म्हणत अज्ञाताने त्यांच्याबरोबर वाद घातला.