belgaum-laxminagar-vadagav-murder-pan-shop-owner-shetty-belgaum.jpg | बेळगाव : वडगावात एकाचा निर्घून खून | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : वडगावात एकाचा निर्घून खून

belgavkar.com | belgaum | belgavkar

उधारी देण्यास नकार दिल्याने खून

बेळगाव : वडगाव येथील लक्ष्मी नगरमध्ये एका पान दुकानाच्या मालकाची निर्घृण हत्या झाली आहे. वडगाव परिसरातील लक्ष्मीनगरचे रहिवासी बाळकृष्ण नागेश शेट्टी (वय 50, मूळ रा. कुंदापूर जि. उडपी सध्या रा. लक्ष्मीनगर तिसरा क्रॉस वडगाव) यांची मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली.
लक्ष्मी नगरमध्ये अनेक वर्षांपासून पान दुकान चालवणाऱ्या शेट्टी यांच्यावर रात्री अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांची हत्या केली. खुनाचे नेमके कारण..? याचा तपास पोलिस करत आहेत. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केलायं. याप्रकरणी संशयित दत्तात्रय उर्फ दत्ता शिवानंद उर्फ शिवाप्पा जंतीकट्टी (रा. भारतनगर, शहापूर) याच्याविरोधात शहापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, अनेक वर्षापासून लक्ष्मीनगर येथे बाळकृष्ण हे पान टपरी चालवत होते. काल रात्री संशयित दत्तात्रेय त्यांच्या पान टपरीवर गेला होता. त्यावेळी त्याने उधारी साहित्य देण्याची मागणी केली. मात्र, बाळकृष्ण यांनी उधारी देण्यास नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात तो तेथून निघून गेला. रात्री नेहमीप्रमाणे पान टपरी बंद करून 10.05 च्या सुमारास बाळकृष्ण हे आपल्या घराकडे आले. त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या दत्तात्रेय याने अचानक बाळकृष्ण यांच्यावर हल्ला करत त्यांच्या पोटात चाकू भोसकला तसेच तोंडावर व शरीरावर देखील सपासप वार केले. त्यामुळे बाळकृष्ण रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर संशयितांने घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची माहिती समजताच शहापूरचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.