मित्राला पत्नीच्या घरी नेऊन ‘हलाला’चा प्रयत्न; एमआयएमच्या नेत्याविरोधात गुन्हा दाखल

मित्राला पत्नीच्या घरी नेऊन ‘हलाला’चा प्रयत्न;
एमआयएमच्या नेत्याविरोधात गुन्हा दाखल

belgavkar.com | belgaum | belgavkar

दिल्ली पोलिसांनी एमआयएमचे माजी नेते रियाझुद्दीन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीसोबत पुन्हा लग्न करण्यासाठी रियाझुद्दीन यांनी आपल्या मित्राला सोबत नेऊन ‘हलाला’चा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दिल्लीमधील जामिया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार आणि छळाचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एमआयएम नेत्याविरोधात विनयभंग आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हादेखील दाखल केला आहे.
एफआयआरनुसार, महिला जामिया नगरमध्ये आपल्या मुलासह वास्तव्यास होती. महिलेने 2012 मध्ये पहिल्या पतीचा मित्र फरियादसोबत लग्न केलं होतं. त्यानेदेखील महिलेला तिहेरी तलाक देत लग्न मोडलं होतं. नऊ वर्षांनी रियाझुद्दी आपल्या त्या मित्रासोबत पत्नीच्या घरी पोहोचले. पुन्हा एकदा तिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्यांनी आपलाच मित्र आणि महिलेच्या दुसऱ्या पतीकडून हलालाचा प्रयत्न केला. रियाझुद्दीन यांनी जर तिने हलाला प्रथा पार पाडली तर आपण पुन्हा लग्न करण्यास तयार असल्याचं म्हटलं. यावेळी तिने नकार दिला असता मारहाण केली, तसंच तिचे कपडेही फाडल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
यावेळी महिलेवर जबरदस्ती करत बलात्काराचाही प्रयत्न झाला. यावेळी झालेल्या गोंधळामुळे परिसरातील नागरिकांनी घराबाहेर गर्दी केली होती. महिलेने आरोपी पती उत्तर प्रदेशात एमआयएमचा सचिव असल्याचं सांगितलं असून आपल्याला अनेकदा जीवे मारण्याची धमकी देत होता असाही आरोप केला आहे. दुसरीकडे आरोपीने आपण राजकारण सोडलं असून महिला आपल्याकडे पैशांची मागणी करत होती, तसंच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत होती असा दावा केला आहे.
हलाला म्हणजे काय? हलाला या प्रथेला ‘निकाह हलाला’ असंही म्हटलं जातं. ही प्रथा त्या घटस्फोटित महिलांसाठी आहे ज्यांना परिस्थितीमुळे पुन्हा एकदा आपल्या पहिल्या पतीसोबत लग्न करण्याची इच्छा आहे. यासाठी त्यांनी हलालाचं पालन करावं लागतं. प्रथेनुसार, जर एखाद्या व्यक्तीने पत्नीला घटस्फोट दिला असेल तर तो तोपर्यंत तिच्याशी पुनर्विवाह करु शकत नाही जोपर्यंत ती दुसऱ्या व्यक्तीशी लग्न म्हणजेच निकाह करुन घटस्फोट घेत नाही. इतकंच नाही तर त्या व्यक्तीसोबत शरीरसंबंध ठेवण्याचीही अट आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

मित्राला पत्नीच्या घरी नेऊन ‘हलाला’चा प्रयत्न; एमआयएमच्या नेत्याविरोधात गुन्हा दाखल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm