गणेश चतुर्थीला गणेशाची स्थापना; गणेश चतुर्थीच्या दिवशी या शुभ वेळेत गणपतीची प्रतिष्ठापना करा

गणेश चतुर्थीला गणेशाची स्थापना;
गणेश चतुर्थीच्या दिवशी या शुभ वेळेत गणपतीची प्रतिष्ठापना करा

belgavkar.com | belgaum | belgavkar

गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे, ज्याला विनायक चतुर्थी असेही म्हणतात. यावर्षी गणेश चतुर्थीला गणेशाची स्थापना मुहूर्तानुसार दुपारी 1.50 पर्यंत करता येणार आहे, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी कळवले. भाद्रपद महिन्यातील शुक्‍ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. पार्थिव गणेश स्थापना करण्याचा भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एकच दिवस असल्याने त्या दिवशी जमले नाही तर पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येत नाही. एखाद्या वर्षी काही कारणाने लोप झाल्यास पुन्हा पुढील वर्षी गणपती पूजन करता येते.
गणपतीची मूर्ती 8-15 दिवस आधी आणून घरामध्ये ठेवता येते. श्रीगणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस किंवा त्याच दिवशी सकाळी मूर्ती आणावयास पाहिजे असे नाही, असे पंचांगकर्ते दाते म्हणाले. पार्थिव गणेश स्थापना दुपारी 1.50 पर्यंत करता येईल. त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, विष्टिकरण आदी वर्ज्य नाहीत, म्हणून ते पाहू नयेत.
यंदाचे गणेशोत्सवातील महत्त्वाचे दिवस :
गणेश चतुर्थी : 10 सप्टेंबर 2021, शुक्रवार श्रीगणेश चतुर्थी मूर्ती स्थापना : या दिवशी पहाटे 4.50 पासून दुपारी 1.50 पर्यंत कधीही घरगुती गणेशाची स्थापना करता येईल.


12 सप्टेंबर 2021, रविवारी गौरी आवाहन


13 सप्टेंबर 2021, सोमवारी गौरी पूजन


14 सप्टेंबर 2021, मंगळवारी गौरी विसर्जन


19 सप्टेंबर 2021, रविवारी अनंत चतुर्दशी
घरामध्ये गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची आहे. ही प्राणप्रतिष्ठा करून बसविलेली मूर्ती उत्तरपूजा करून देव्हाऱ्यातून खाली काढतात व तिचे पाण्यात विसर्जन करतात. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून पाण्यात विसर्जन करावे, असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टॅंकमध्ये, तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यातसुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्‍यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी. प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा तत्सम पाण्यात न विरघळणाऱ्या पदार्थांची मूर्ती नसावी.
अनेकजण दरवर्षी उत्सवासाठी आपल्या गावी जात असतात. यावर्षी त्यांना गावी जाणे शक्‍य नसल्यास त्यांनी राहत्या घरी वरीलप्रमाणे गणेशोत्सव करून आपली गणेश पूजनाची परंपरा अखंडित ठेवावी. यावर्षी कोरोना संकटामुळे ज्याप्रमाणे अनेक बदल आपण अंगीकारले आहेत. त्याप्रमाणे गणेश उत्सवात सुद्धा आपणास बदल करावा लागेल. तेव्हा अशा प्रकारे श्री गणेशाचे पूजन करावे, असेही पंचांगकर्ते मोहन दाते यांनी कळवले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

गणेश चतुर्थीला गणेशाची स्थापना; गणेश चतुर्थीच्या दिवशी या शुभ वेळेत गणपतीची प्रतिष्ठापना करा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm