बेळगाव : तब्बल 10 फुटी मगर पकडली;

बेळगाव : तब्बल 10 फुटी मगर पकडली;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कृष्णा नदीला आलेल्या महापुराच्या पाण्याबरोबर इंगळी (ता. चिक्कोडी) येथील शेतात तब्बल 10 फुटी मगर निदर्शनास आली. अखेर युवकांकडून गुरूवारी तिला जेरबंद करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. इंगळी-मांजरी रस्त्यावरील बाजूला असलेल्या शेतात बुधवारी रात्री दहा वाजता इंगळीतील ग्रामस्थांच्या निदर्शनास ही मगर आली.
गुरुवारी इंगळी येथील ग्रामस्थांनी जिवंत मगर पकडून आपले साहस दाखविले आहे. जेरबंद करण्यात आलेली मगर प्राणी संग्रहालयात सोडून देणार आहोत. रस्त्यावर अजस्त्र मगर असल्याचे समजताच इंगळी येथील ग्रामस्थ संजय कुडचे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिला जेरबंद करून गुरूवारी (सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले.
इंगळी येथील अजस्त्र मगर जेरबंद करण्यासाठी सचिन घाटगे, राजू जाधव, श्रीकांत चौगुले, कैलास मगदूम, शशिकांत जाधव, अप्पासाहेब घाटगे, अवधूत जाधव, पिंटू चौगला, संतोष चौगले, पंकज उपाध्ये व युवकांनी परिश्रम घेतले. त्यामुळे त्यांचे परिसरात कौतूक होत आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : तब्बल 10 फुटी मगर पकडली;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm