वेळीच व्हा सावध! जुन्या नोटा आणि नाण्यांसंदर्भात कोट्यवधी लोकांना RBI ने केलं अलर्ट अन्यथा...

belgavkar.com | belgaum | belgavkar

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI Reserve Bank of India) लोकांना जुन्या नोटा खरेदी किंवा एक्सचेंजच्या नावाखाली होत असलेल्या फसवणुकीविरोधात सावध केले आहे. जुन्या नोटा आणि नाणी खरेदीसाठी सध्या मोठ्या प्रमाणात बनावट ऑफर्स देण्यात येत आहेत. या ऑफरला बळी पडू नका असं आवाहन आता बँकेच्या वतीने करण्यात आलं आहे. काही लोक बँकेच्या नावाने फसवणूक करत आहेत. परंतु बँकेचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आणि कधीही कोणाकडून कोणतेही शुल्क किंवा कमिशन मागत नाही असं स्पष्टीकरण यावर आरबीआयकडून देण्यात आलं आहे. 
वेगवेगळ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमांतून सर्वसामान्यांची मोठी फसवणूक केली जात आहे. जुन्या नोटा आणि नाण्यांच्या खरेदी आणि विक्रीशी संबंधित व्यवहारांमध्ये शुल्क किंवा कमिशनची मागणी करत आहेत. याला फसू नका असं आरबीआयने म्हटलं आहे. तसेच य़ाबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देखील माहिती दिली आहे. 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही सदस्याला, कर्मचाऱ्याला किंवा कंपनीला किंवा संस्थेला अशा व्यवहारांसाठी अधिकार देण्यात आलेले नाहीत' असं म्हटलं आहे.  रिझर्व्ह बँकेने सामान्य लोकांना अशा बनावट आणि फसव्या ऑफरच्या जाळ्यात न अडकण्याचा सल्ला दिला आहे.
ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी याआधी देखील आरबीआयने लोकांना वेळोवेळी अलर्ट करून याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळेच आता देखील जुन्या नोटा आणि नाणी याबाबत दिल्या जाणाऱ्या ऑफर्सला बळी पडू नका असा सल्ला देण्यात आला आहे. विविध मार्गांचा वापर करून हॅकर्स युजर्सना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. अनेक जण ऑनलाईन फ्रॉडचे शिकार होत आहेत.
It has come to the notice of Reserve Bank of India that certain elements are fraudulently using name/logo of RBI, and seeking charges/commission/tax from public, in transactions related to buying and selling of old banknotes & coins through various online/ offline platforms: RBI

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

वेळीच व्हा सावध! जुन्या नोटा आणि नाण्यांसंदर्भात कोट्यवधी लोकांना RBI ने केलं अलर्ट अन्यथा...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm