आओ जाओ घर तुम्हांरा.... आणि कोरोना हमारा...

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटकात सक्ती, महाराष्ट्रात मात्र मुक्ती

कर्नाटकातून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांची ना तपासणी केली जाते ना लसीकरणाची विचारणा.

कर्नाटकात जाताय तर 72 तासांपूर्वीची कोरोना चाचणी हवीच अशी सक्ती कर्नाटक सरकारने केली आहे. तर महाराष्ट्रात सक्तीच नसल्याचे दिसत आहे. यामुळे आओ जाओ घर तुम्हारा... असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सांगलीच्या मिरज बस स्थानकावर कर्नाटकातून येणाऱ्या शंभर बसेस पूर्ण क्षमतेने भरून येत आहेत. त्यांना महाराष्ट्रात येताना कोणती बंधणे नाहीत, मात्र मिरज बस स्थानकातून कर्नाटक महामंडळच्या गाडीने प्रवास करताना वाहकांकडून कोरोना नेगिटीव्ह चाचणी आणि लसीकरणाचा डोस घेतल्याची खात्री करूनच बसमध्ये प्रवेश दिला जात आहे.
मिरज बस स्थानकातील प्रवाशांना याचा प्रत्यय आला. मात्र कर्नाटकातून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांची ना तपासणी केली जाते ना लसीकरणाची विचारणा म्हणजे आओ जाओ घर तुम्हांरा.... आणि कोरोना हमारा... असाच प्रकार मिरज बस स्थानक आणि रेल्वे स्थानकात पाहायला मिळते. विशेष म्हणजे कर्नाटक परिवहन बसेसने अथवा रेल्वे मार्गाने कर्नाटकात येणाऱ्यांना स्थानकात उतरताच चाचणीची सक्ती आहे. मात्र महाराष्ट्रात अशी सक्ती ना रेल्वे स्टेशनवर आहे ना बस स्थानकावर आहे.
कर्नाटकातून नियमितपणे बेळगाव, संकेश्वर, निपाणी, हुक्केरी, चिकोडी, कागवाड, अथणी, जमखंडी, विजापूर या आगारांमधून शंभरहून अधिक गाड्या येतात. यामधून हजारो प्रवासी मिरजेत दाखल होतात. यांची चाचणी गृहविलगीकरण आवशक्य आहे. महाराष्ट्रातील प्रवाशांविषयी घेतलेला कर्नाटकचा निर्णय योग्यच म्हणावा लागेल. कारण सुरक्षा महत्त्वाचीच आहे. कर्नाटकातून मिरजेत येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करावी, अशी आमची मागणी आहे यासाठी तहसीलदार यांच्याशी बोलणे झाले आहे. तहसीलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी परवानगी घेऊन निर्णय घेऊ, अशा सूचना दिल्या आहेत.
- शिवाजीराव खांडेकर, मिरज आगारप्रमुख

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

आओ जाओ घर तुम्हांरा.... आणि कोरोना हमारा...
कर्नाटकात सक्ती, महाराष्ट्रात मात्र मुक्ती

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm