कर्नाटक राज्यातील कोरोना संकट गंभीर होताना दिसत आहे. कोरोनानं हळूहळू सर्वच शहरांमध्ये हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. बेंगळूर, दक्षिण कन्नड पाठोपाठ म्हैसूरमध्ये कोरोनानं डोकं वर काढलं आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन प्रशासनानं राजधानी बेंगळूरात 16 ऑगस्टपर्यंत नाईट कर्फ्यू लागू (रात्री 10 ते सकाळी 6) करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळेत कलम 144 लागू राहील.
राज्यातील अनेक शहरातील परिस्थिती कोरोनामुळे बिघडत चालली आहे. बेंगळूर शहरातही रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून, जिल्हा व महापालिका प्रशासन सर्तक झालं आहे. कोरोना परिस्थितीसंदर्भात बेंगळूरात नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे. 16 ऑगस्टपर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे.