Karnataka_Govind_Karjol_Karnataka.jpeg | बेळगावच्या पालकमंत्रीपदी झाली निवड | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगावच्या पालकमंत्रीपदी झाली निवड

belgavkar.com | belgaum | belgavkar

पालकमंत्रीपदी पुन्हा गोविंद करजोळ

हुक्केरीचे (बेळगाव) आमदार उमेश कत्ती बागलकोटचे पालकमंत्री
बागलकोटचे आमदार गोविंद करजोळ बेळगावचे पालकमंत्री
निपाणीच्या (बेळगाव) आमदार शशिकला जोल्ले विजयपूरच्या पालकमंत्री
बेळगावला पुन्हा मिळाले दुसर्‍या जिल्ह्यातील (बागलकोट) पालकमंत्री
बेळगाव : अश्‍लिल सीडी प्रकरणी माजी मंत्री पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर बेळगाव जिल्हा पालकमंत्रिपद रिक्त झाले होते. बेळगाव जिल्ह्याला पाचव्यांदा पालकमंत्री शोधण्याची वेळ आली होती. यामुळे (माजी) मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी (माजी) उपमुख्यमंत्री गोविंद करजोळ यांची बेळगावच्या पालकमंत्रीपदी निवड केली होती. त्यानंतर बीएस येडियुरप्पा यांनी 26 जुलै रोजी राजीनामा दिल्यानंतर बोम्मई यांनी 28 जुलै रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजीनामा दिल्यानंतर नवे राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज बुधवारी झाला आहे.
29 जणांना नवीन मंत्रिमंडळात समाविष्ट केले आहे. दरम्यान आज रात्री 8 वाजता राज्यातील सर्व जिल्हा पालकमंत्र्यांची निवड करण्यात आली आहे. पुन्हा बेळगाव जिल्हा पालकमंत्रीपदी गोविंद करजोळ यांची निवड करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्याला दोन मंत्रीपद मिळाले असतानाही बेळगावच्या पालकमंत्रीपद दुसर्‍या जिल्ह्यातील आमदारांची निवड झाली आहे.
(माजी महिला आणि बालकल्याण मंत्री) शशिकला जोल्ले - निपाणी (बेळगाव)
(माजी अन्नपुरवठा मंत्री) उमेश कत्ती - हुक्केरी (बेळगाव)