अयोध्येच्या राम मंदिराचं काम वेगात सुरू; भक्तांसाठी खुलं कधी होणार?

अयोध्येच्या राम मंदिराचं काम वेगात सुरू;
भक्तांसाठी खुलं कधी होणार?

belgavkar.com | belgaum | belgavkar

2023 मध्ये भक्तासांठी खुलं होणार मंदिर

अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतर प्रभू रामाची वाट पाहाणाऱ्या राम भक्तांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. हे रामाचे भक्त आता डिसेंबर 2023 पासून प्रभू रामाचे दर्शन घेऊ शकणार आहेत. वेळेत काम पूर्ण करण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू आहेत. 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराची पायाभरणी केली होती, तेव्हापासून मंदिराला मूर्त स्वरूप देण्यास सुरुवात झाली. मंदिराच्या बांधकामासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून देणग्या गोळा केल्या जात होत्या. त्याचबरोबर राम मंदिर निर्माण समिती बांधकामासाठी काम करत आहे.
जुलैच्या झालेल्या राम मंदिर बांधकाम समितीमध्ये यावर चर्चा झाली. 2023 मध्ये म्हणजे नियोजित वेळेच्या एक वर्ष आधी, भव्य राम मंदिरात रामाचे दर्शन घेता येणार आहे असे सांगण्यात आले होते. बैठकीत राम मंदिराचा परिसर पर्यावरणपूरक असेल असा निर्णय घेण्यात आला. येथे त्रेतायुगाच्या सुंदर दृश्यांसह, भक्तांसाठी आधुनिक सुविधांवर पूर्ण लक्ष असेल. संपूर्ण परिसर 2025 च्या अखेरीस विकसित केला जाईल.
उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यापूर्वीच याची अधिकृत घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. तर लोकसभा निवडणुकीपूर्वी भाविकांसाठी हे मंदिर खुलं होणार आहे. 2024 साली देशात लोकसभा निवडणुका होणार असून त्यापूर्वी हे मंदिर खुलं केल्याचा मोठा राजकीय फायदा भाजपला होईल, असं मानलं जात आहे. मंदिराचं काम पूर्ण व्हायला 2025 साल उजाडणार असून 67 एकर परिसरात रामाचं भव्य मंदिर साकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंदिराचं प्रवेशद्वार पूर्वेकडे असावं, असं नियोजन होतं. मात्र पूर्वेकडील जमीन कमी असल्यामुळे मंदिर प्रशासनाने जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या जमिनीसह आता 110 एकर परिसरात मंदिर कॉम्प्लेक्स उभं राहणार असून त्यासाठी 900 ते 1000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
मंदिर परिसरात संग्रहालय : अयोध्येतील राममंदिर परिसरात संग्रहालय आणि संशोधन केंद्रदेखील उभारण्यात येणार आहे. त्याशिवाय प्रशासकीय इमारत, गेस्ट हाऊस, संतमहंतांचं निवासस्तान आणि प्रसादगृह यांची उभारणी केली जात आहे. याशिवाय कुबेर महाल, सीता कुंड यासारख्या रचनादेखील साकारल्या जाणार आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

अयोध्येच्या राम मंदिराचं काम वेगात सुरू; भक्तांसाठी खुलं कधी होणार?
2023 मध्ये भक्तासांठी खुलं होणार मंदिर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm